किशोर भाऊंना या वेळेस तरी नशिबाची साथ लाभेल काय? : अनेक समर्थकांच्या डोळ्यात पाणी ! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

किशोर भाऊंना या वेळेस तरी नशिबाची साथ लाभेल काय? : अनेक समर्थकांच्या डोळ्यात पाणी !

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मिळवलेली कांग्रेस ची विधानसभा उमेदवारी गमावण्याची वेळ किशोर जोरगेवार यांचेवर येणार की यात काही सेटींग होईल याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
 काँग्रेस च्या काही नेत्यांनी नामांकन भरण्याच्या तोंडावर अडंगा आणल्याने जोरगेवारां सोबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचीही धडकन वाढणार आहेच.जोरगेवारांस उमेदवारी दिल्यास आपण पक्षातून आऊट ह़ोण्याची धमकी काही नेत्यांनी  दिल्याची धमकी दिल्याचे वुत्त असून जोरगेवार समर्थकांना धडकी भरते स्वाभाविक ठरते. 

जोरगेवारांना कांग्रेस प्रवेशाआधी आपणास शेवटच्या क्षणी प्रखर विरोध होईल याची कल्पना असेल म्हणून २ दिवसांआधी काही जवळच्या कार्यकर्त्यांजवळ त्यांनी शंका व्यक्त केली होती हे विशेष.बाहेरून आलेल्या व्यक्तीला उमेदवारी देण्यास तसाही माजी खासदार नरेश बांबू पुगलियांचा प्रखर विरोध आधीच आहे त्यात आता पक्षात राजकीय वजन वाढलेल्या एका नेत्याने  हा हेलिकॉप्टर शॉट टाकल्या ने व ते आपल्या संकटावर कायम राहिल्यास जोरगेवारांना वेगळा निर्णय ध्यावा लागणार आहे.गत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ह्याच नेत्याला  डावलल्यास वडेट्टीवार यांनी पक्षश्रेष्टींना राजीनामाची धमकी दिली होती.

हाच नेता  राजकीय अपेक्षेनुसार एक पाऊल पुढेच आले असून आता वडेट्टीवार यांनी पुढे केलेल्या उदेदवारास विरोध करीत पक्ष सोडण्याची धमकी दिली असल्याची खमंग चर्चा आहे.

किशोर जोरगेवार हे सुद्धा “कच्चा गुरूचे “चेले नाहीतच.परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक राजकीय परिपक्वता त्याच्यात आहे असेही जाणकार बोलताना दिसतात.