धक्कादायक : मेढेंना बी फॉर्म इ-मेल करणारा काँग्रेस नेता कोन ? : जोरगेवार संभ्रमात : केंद्रीय काँग्रेस नेत्यांनी फसवणूक केल्याचा आरोप - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

धक्कादायक : मेढेंना बी फॉर्म इ-मेल करणारा काँग्रेस नेता कोन ? : जोरगेवार संभ्रमात : केंद्रीय काँग्रेस नेत्यांनी फसवणूक केल्याचा आरोप

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
 
संभ्रमात असलेली कांग्रेसची उमेदवारी आज महेश मेंढे यांना मिळाली, महेश मेंढे व भाजपचे आमदार श्यामकुके यांनी किशोर जोरगेवार यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला, मेंढे व जोरगेवार यांच्या वकीलातर्फे जोरदार युक्तिवाद केला परंतु अखेर जोरगेवार यांची कांग्रेसतर्फे असलेली उमेदवारी रद्द करण्यात आली.महेश मेंढे 3ऑक्टोबर ला काँग्रेस च्या यादीत अधिकृत उमेदवार जाहीर झाले होते तरीही पक्षाचे अधिकृत चिन्ह दर्शविणारा बी फॉर्म त्याना 4ऑक्टोबर सकाळी पर्यंतही पोहोचला नव्हता. त्याना ऐनवेळी बी फॉर्म ई-मेल द्वारे  पाठविण्यात आला व त्याची त्यांनी प्रिंट घेऊन उमेदवारीच्या ए फॉर्म ला प्रिंटेड बी फॉर्म जोडला व जोरगेवारांनी सुद्धा उमेदवारी दाखल केल्यानंतर पेचात पडलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यापुढे मेंढे यांच्या वकिलाने 1)जाहीर अधिकृत उमेदवारी व 2)फॉर्म ऑनलाईन लोड प्रिंटेड जरी असला तरीही त्यावर असलेली डिजिटल स्वाक्षरी दोन मुख्य मुद्यांवरील युक्तिवादाच्या जोरावर मेंढे यांना उमेदवारी मिळवून दिली. परंतु जोरगेवारांना वडेट्टीवार यांनी ओरिजिनल एबी फॉर्म पाठविल्यावरही मेंढे यांना इ-मेल करणारा काँग्रेस चा नेता कोन.विरोध नेमका जोरगेवारांचा की वडेट्टीवारांचा, खासदारांनी जोरगेवारांच्या उमेदवारी वरून राजीनामा देण्याची धमकी दिली असल्याची राजकीय चर्चा असताना नेमका हा इ-मेल कोन केला असेल अशी खमंग चर्चा सध्या आहे. जोरगेवारांची व्यथा मांडणारी पत्रकार परिषद : याबाबत सविस्तर माहिती देत आज किशोर जोरगेवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की जो एबी फॉर्म मला मिळाला तो ग्राह्य होता, माझा एबी फॉर्म हा प्रिंटेड होता, मेंढे यांना जो एबी फॉर्म मिळाला तो प्रिंटेड नव्हता, माझ्या फॉर्मवर चंद्रपूर विधानसभा 71 असा उल्लेख होतो, कांग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची सही आहे, मेंढे यांच्या फॉर्मवर विधानसभेचा साधा उल्लेख पण नाही, प्रदेशाध्यक्ष यांची सही, शिक्का पण चुकीचा होता, सत्ताधारी यांच्या दबावामुळे माझ्या उमेदवारी वर जोरदार आक्षेप घेतला व उमेदवारी रद्द केली. तसेच काँग्रेस च्या वरिष्ठ केंद्रीय नेत्यांनी माझी फसवणूक केली असेही ते पत्रकार परिषदेत बोलले.
पक्षातील वरिष्ठ नेत्याच्या उपस्थिती मध्ये जोरगेवार यांनी कांग्रेस पक्षात प्रवेश घेतला, कांग्रेसतर्फे उमेदवारी मिळणार अशी अपेक्षा जोरगेवार यांना होती परंतु त्यांची जोरगेवार यांचा भ्रमनिरास केला.किशोर जोरगेवार हे विधानसभेच्या रिंगणात उभे राहणार की नाही याबाबत आज दिनांक 6ऑक्टोबर ला  आपली भूमिका जाहीर करणार आहे, सध्या सर्व कार्यकर्ते निवडणूक लढवावी याबाबत आग्रही आहे.कांग्रेस व भाजपने माझी फसवणूक केली, मी निवडणूक लढणार की नाही याची पण मला भीती वाटते या शब्दात जोरगेवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली.माझी आता इच्छा नाही राजकारणात भाग घ्यायची, जोरगेवार हे निवडणूक लढणार की नाही यावर तर सध्या प्रश्नचिन्ह आहे, परंतु जोरगेवार यांचे समर्थक सध्या खूप नाराज झाले आहे.