अतीवृष्ठीग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करा - आमदार सुभाष धोटे - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अतीवृष्ठीग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करा - आमदार सुभाष धोटे

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :राजुरा 
दिनांक 26,27 आॅक्टोबर रोजी अतिवृष्टी झाल्यामुळे राजुरा, कोरपना, जिवती आणि गोंडपिपरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यात सोयाबीन, कापूस, धान व इतर अनेक शेतपिकांना अतिवृष्टीचा जबर फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला आहे. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

तेव्हा सदर दयनीय परिस्थिती लक्षात घेऊन नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून त्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचेकडे केली आहे.