मण्यार जातीच्या सापा सोबत खेळणे सर्पमित्राला पडले महागात : सापाने घेतला चावा - सर्पमित्र गंभीर - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मण्यार जातीच्या सापा सोबत खेळणे सर्पमित्राला पडले महागात : सापाने घेतला चावा - सर्पमित्र गंभीर

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : वरोरा -

वरोरा तालुक्यातील र्सप मित्र म्हणुन काम करणारे धिरज घुमे यांना सापा सोबत खेळने पडले महागात. एका घरात साप निघल्याची माहिती धिरज घुमे यांना मिळाली. त्यानंतर तात्काळ घटनास्थळ कडे प्रस्थान करत साप ताब्यात घेऊन त्यानी वन विभाग येथे सापाची नोंद केली.
कोणत्याही सर्पमित्राने पकडलेला सापाला निर्सग मुक्त करणे हे वन विभाग चे काम असुनही अतिउत्साही  सर्पमित्र  धिरज घुमे स्वतः सापाला निर्सग मुक्त करण्यासाठी घेऊन गेले असता,  सोशल मिडिया वर फोटो पोस्ट करण्यासाठी सापा सोबत खेळणे सुरु केले या दरम्यान मण्यार जातीच्या त्या सापाने चावा घेतला.सर्पमित्र धीरज घुमे याला लगेच उप जिल्हा रुग्णालयात वरोरा येथे नेण्यात आले असता,  प्रकृती गंभीर असल्यामुळे तातडीने जिल्हा रुग्णालय चंद्रपुर येथे पाठविण्यात आले. जिल्हा रुग्णालयात या सर्पमित्रावर उपचार सुरू आहे.मण्यार जातीचा साप भारतात आढळणाऱ्या मुख्य चार विषारी जातीच्या  सापांपैकी एक आहे. मण्यारचे विष नागाच्या विषाच्या १५ पटीने जहाल असते.जास्तीत जास्त  मण्यारवर पाय पडल्याने मण्यार चावण्याच्या घटना घडतात. चावल्यावर लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळणे गरजेचे आहे. मण्यार चावल्यानंतर कधी कधी हा साप चावल्याचेही लक्षात येत नाही. प्रचंड तहान लागते, पोटदुखी सुरू होते व श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. काही काळाने एरवी मेंदूद्वारे नियंत्रित होत असलेली श्वसनप्रणाली बंद पडून मृत्यू ओढवतो.

अश्या जहाल विषारी सापाला हाताळताना निव्वळ सोशल माध्यमाच्या प्रसिद्धी हव्यासासाठी स्वतः चा जीव धोक्यात घालणे या सर्पमित्राच्या जीवावर बेतले यातून इतरांनीही धडा घ्यायला हवा.