जिल्ह्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या : दुष्काळजन्य परिस्थितीवर शासनाचे दुर्लक्ष - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्ह्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या : दुष्काळजन्य परिस्थितीवर शासनाचे दुर्लक्ष

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा

राजुरा तालुक्यातील  मौजा खैरगुडा येथील शेतकरी सुभाष लक्ष्मण ठाकरे (वय 40) यांनी आज आपले राहते घरी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न उघडकिस आल्यावर,  लगेच राजुरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करत असताना मृत्यू झाल्याची घटना काल दिनांक 25ऑक्टोबर ला घडली. 

मृतक पश्चात कुटुंबात पत्नी व अपंग मुलासहित दोन मुले असून आपल्या 5एकर च्या शेतीत झालेली नापिकी व बँक ऑफ इंडिया पंढरपोवनी शाखेचे 1लाखाचे पीक कर्ज व 55हजाराचे वाहन कर्ज असल्याची नोंद पंढरपोवनी साजा तलाठी यांनी आज प्राथमिक अहवालात घेतली.

अश्याच  घटनेत  काल दिनांक 25ऑक्टोबर ला कोरपना तालुक्यातील सोनुर्ली येथे तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. सततच्या पावसाच्या रीपरिपीमुळे शेतकऱ्यांचे पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून दरवर्षी च्या तुलनेत अल्प पीक हातात आल्याने अल्पभूधारक शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून ऐन दिवाळीत चंद्रपूर जिल्ह्यातील एकाच दिवशीं दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने समाजमन हळहळले.

निवडणुकीची धुमाळी आटोपली असून शासन-प्रशासनिक पातळीवर ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत पोहोचविण्याची मागणी जोर धरत आहे.