आदर्श गाव घाटकुळ येथे 'स्वच्छता ही सेवा उपक्रम' व महाश्रमदान - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आदर्श गाव घाटकुळ येथे 'स्वच्छता ही सेवा उपक्रम' व महाश्रमदान

Share This
स्वच्छतेतून समृद्ध गाव निर्माणासाठी प्रत्येकांनी पुढाकार घ्या : राहुल कार्डिले 
खबरकट्टा / चंद्रपूर : पोंभुर्णा -

             
वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता राखणे प्रत्येकांची जबाबदारी असून स्वच्छता हीच खरी सेवा आहे. आपले तन- मन प्रसन्नतेसाठी परिसर निटनेटका ठेवा. गावात समता, बंधुभावाने काम करा. स्वच्छतेतून समृद्ध गाव निर्माण होतो, त्यासाठी सर्व गावक-यांनी पुढाकार घेवून इतरांना प्रेरणा देणारे गाव घडवावे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राहूल कर्डीले यांनी केले. 


राज्यस्तरावर आदर्श गाव पुरस्कृत ग्रामपंचायत घाटकुळ येथे आयोजित स्वच्छता ही सेवा उपक्रम व महाश्रमदान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी पचारे, गटविकास अधिकारी धनंजय साळवे, विस्तार अधिकारी कुर्झेकर, पोलीस पाटील अशोक पाल, ग्रामपरिवर्तक अविनाश पोईनकर उपस्थित होते. बैलबंडीत मिरवणूक काढून गावक-यांनी पाहूण्यांचे स्वागत केले. 

उपमुख्य कार्यकारी अधिकारी पचारे यांनी ग्राम स्वच्छता अभियानाची माहीती सांगून गावाने जिल्हा व राज्यस्तरावर यश मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत मार्गदर्शन केले. तालुका प्रशासनाकडून गावाला विशेष योगदान दिल्याबद्दल गटविकास अधिकारी धनंजय साळवे यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातून नाविण्यपूर्ण उपक्रम व लोकसहभागामुळे घाटकुळ गावाने नावलौकीक मिळवला आहे. नियमीत शौचालयाचा वापर करण्याबाबत गणपत देठे, झित्राजी बावणे, ओमदेव देवाळे यांचा तर गावात दारुबंदीबाबत विशेष योगदान देणारे अशोक मेदाळे यांचा सत्कार करण्यात आला. 

गावात स्वच्छताविषयक जनजागृती करणारे आदर्श स्वेच्छागृही राम चौधरी यांचा विशेष गौरव करण्यात आला. गावात स्वच्छता अभियान सक्रिय राबवून विशेष योगदान देणारे मराठा युवक मंडळ, जनहीत बहुउद्देशीय मंडळ, निर्मल महिला ग्रामसंघ, संत गोरोबा बचत गट, अंगणवाडी सेविका, जिल्हा परिषद शाळा व महात्मा फुले विद्यालयांच्या शिक्षकवृंदांना सन्मानित करण्यात आले‌. 'स्वच्छ गाव' या विषयावर आधारित घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत रेणूका बचत गट, निलीमा पाल, दर्शना दुधे, भाविका सरपे, गिता पिंपळशेंडे यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपरिवर्तक अविनाश पोईनकर यांनी केले. संचालन अरविंद भंडारे यांनी तर आभार ग्रामसेविका ममता बक्षी यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. 


सिईओ कर्डीले यांचे गावक-यासह श्रमदान :माहात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त महाश्रमदानात मुख्य कार्यपालन अधिकारी राहूल कर्डीले गावक-यांसोबत सहभागी झाले. गावातील रस्ते व चौक स्वच्छ करण्यात आले. शोषखड्याचे भुमीपुजन करण्यात आले‌. गावातील प्लाॅष्टीक स्वत: गोळा करण्यात त्यानी पुढाकार घेतला. गावात प्लाॅष्टीक वापरावर बंदी करण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा परिषद स्वच्छता विभागाचे प्रकाश उमक, साजीद निजामी, त्रुशंत शेंडे, मनोज डांगरे, बंडू हिरवे प्रफुल्ल मत्ते, प्रविण निमकर यांनी विशेष सहकार्य केले. अधिकारी गावात स्वत: श्रमदान करतांना पाहून गावक-यांत उत्साह निर्माण झाला.