पारोमिता गोस्वामींचे उमेदवारी नामांकन आम आदमी च्या भव्य शक्ती प्रदर्शनांत दाखल. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पारोमिता गोस्वामींचे उमेदवारी नामांकन आम आदमी च्या भव्य शक्ती प्रदर्शनांत दाखल.

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपुरी -

श्रमिक एल्गारच्या संस्थापिका  अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघातून आम आदमी पक्षाच्या चिन्हावरकाल दिनांक 3ऑक्टोबर  उमेदवारी नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कडे सादर केला. तत्पूर्वी प्रमुख मार्गाने रॅली काढण्यात आली. यात जिवती पहाङावरील आदिवासी रेला नृत्य, घोसाङी वाद्य, नृत्य, गुरुदेव सेवा मंडळाचे सुमधूर भजन, तरुणींचा जयघोष, जिल्ह्यातील सर्व आम आदमी, हातात झाडू घेऊन लोकशाहीच्या स्वच्छतेचा नारा देण्यात आला. 

ब्रह्मपुरी येथील नागभिड मार्गावर दुर्गा सभागृहात विजय संकल्प मेळावा घेण्यात आला यावेळी मंचावर उमेदवार एडवोकेट पारोमिता गोस्वामी, आम आदमी पक्षाच्या राज्य नेत्या प्रीती मेनन, राज्याचे कोषाध्यक्ष जगजीत सिंग, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष राजेश्वर सहारे, उपाध्यक्ष विजय सिद्धावार, महासचिव घनशाम मेश्राम,  आपचे लोकसभा प्रमुख मनोहर पवार, सुनील मुसळे, यांच्यासह आम आदमी पक्षाचे पदाधिकारी आणि श्रमिक एल्गारचे पदाधिकारी उपस्थित होते. अॅड. गोस्वामी यांनी संकल्प मेळाव्यात मार्गदर्शन करतांना ही लोकशाहीची लढाई आपन निश्चित जिंकनार असा विश्वास देत परीवर्तनाला सर्वांनी साथ द्यावी असे आव्हान त्यांनी या मेळाव्यातून केले. 


पारोमिता गोस्वामी यांच्या नामनिर्देशनपत्रावर सूचक/अनुमोदक म्हणून आदिवासी, जबरानजोतधारक, फुटपाथ व्यवसायिक, निराधार महिला, बेघरवासी, बेरोजगार तरुण, असंघटित कामगार यांनी स्वाक्षरी केल्या.