श्री शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त फिट इंडिया प्लॉगिंग चे आयोजन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

श्री शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त फिट इंडिया प्लॉगिंग चे आयोजन

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :राजुरा -

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०वी जयंती व व लाल बहादूर शास्त्री यांच्या  जयंतीनिमित्त श्री शिवाजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथक व नेहरू युवा केंद्र जिल्हा चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मा. क्रीडा आणि खेल मंत्रालय भारत सरकार यांच्या निर्देशानुसार सर्व नागरिक सुदृढ असावे व सोबतच भारत प्रदूषणमुक्त असावा यासाठी फिट इंडिया प्लॉगिंग रन चे आयोजन करण्यात आले.


यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सुरवातीला सिंगल युझ प्लास्टिक फ्री इंडिया ची शपथ विद्यार्थ्यांना रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.गुरुदास बल्की यांनी दिली त्यानंतर महाविद्यालयीन परिसरातील प्लास्टिक गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला, त्यांनतर महाविद्यालयापासून मुख्य रस्त्यांनी राजुरा येथील बसस्थानक पर्यंत फिट इंडिया प्लॉगिंग चे आयोजन करण्यात आले,विद्यार्थ्यांनी रस्त्यात/ रस्त्याच्या बाजूला असलेले प्लास्टिक गोळा करून नगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापन गाडीमध्ये जमा केले. 

तसेच रस्त्यांनी सिंगल युझ प्लॅस्टिक फ्री इंडिया साठी फेरी काढण्यात आली व मुख्य चौकात आणि बसस्थानक परिसरात स्वच्छता ही सेवा या विषयावर पथनाट्ये सादर करून जनतेत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला.


पर्यावरण संरक्षणासाठी प्लॅस्टिक चा वापर टाळणे अतीआवश्यक आहे असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. वारकड यांनी केले.


या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. वारकड, संस्थेचे सचिव अविनाश जाधव, जि. प. सदस्या मेघाताई नलगे, उपप्राचार्य, डॉ. खेरानी, प्रा. बारई, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बल्की, डॉ. सारिका साबळे, प्रा. रायपुरे, प्रा. आत्राम, प्रा. मालेकर, प्रा. मलीक,प्रा. वसाके, प्रा. जांभूळकर तसेच इतर सर्व प्राध्यापकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे स्वयंसेवक व महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.