कचऱ्यामुळे मोकाट गुरांचे (जनावरांचे ) आरोग्य धोक्यात : प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कचऱ्यामुळे मोकाट गुरांचे (जनावरांचे ) आरोग्य धोक्यात : प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :


जिवती शहरात सध्या मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर बनला आहे,शेतकरी व गुरेपालक आपली गुरे ( जनावरे ) चरण्यासाठी शहरात मोकाट सोडून देत आहेत.याचा नागरिकांना व वाहन चालकांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे,ही जनावरे चरण्यासाठी नागरिकांनी घरा बाहेर व दुकानाबाहेच्या  नगर पंचायतिच्या कचऱ्या कुंडीवर ताव मारताना दिसत आहेत याच कुंड्या मध्ये नागरिक,दुकानदार कचरा व अन्न पदार्थ टाकतात व कधी कधी टोकदार वस्तू,प्लास्टिकच्या पिशव्या जनावरे खात आहेत त्यामुळे जनावरांच्या आरोग्यवर परिणाम होत आहे.


याच मोकाट व हिंस्त्र बनलेल्या जनावराच्या चौकात झुंडी लागतात त्यामुळे वाहतुकीला,नागरिकाला व शाळकरी मुलांना अडचण निर्माण होत आहे, त्यामुळे वाहनचालकांना आपला जीव वाचवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.तरी संबधीत प्रशासनाने मोकाट जनावरांच्या मालकांचा शोध घेऊन त्यांच्या मालकावर दंड लावून कठोर कारवाई करावी व कचरा कुंड्यातील कचरा नगर पंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांनी रोज उचलावा असे नागरिकांचे म्हणणे आहे