ब्रेकींग बातमी : राष्ट्रवादी पक्ष,काँग्रेसमध्ये विलीन होईल : सुशीलकुमार शिंदे यांचं वक्तव्य - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकींग बातमी : राष्ट्रवादी पक्ष,काँग्रेसमध्ये विलीन होईल : सुशीलकुमार शिंदे यांचं वक्तव्य

Share This
-
विलीनीकरणावर लवकरच होणार शिक्कामोर्तब ! -सुशील कुमार शिंदे 
खबरकट्टा / महाराष्ट्र :

काँग्रेस आणि राष्ट्रवादी आज जरी वेगळी असली तरी पूर्वी एकाच झाडाखाली वाढलेली आहे. भविष्यात आम्ही जवळ येणार आहोत. काँग्रेस एकत्रित होणार आहे,असे संकेत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात दिले.काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघेही थकलेले आहेत. आम्ही दोघे कधीकाळी एका आईच्या मांडीवर वाढलेलो आहोत. इंदिरा गांधी , यशवंतराव चव्हाण यांचे नेतृत्व घेऊन पुढे आलो आहोत. त्यामुळे आमच्याही मनात खंत आहे,त्यांच्याही मनात खंत असेल , पण ते बोलून दाखवत नाहीत.लवकरच  वेळ येईल व ते करतील. पण त्याची सुरुवात आज विधानसभेच्या निमित्ताने सोलापुरातून एकत्र येऊन काम करत असल्याबद्धल शिंदे यांनी समाधान व्यक्त केले.


शिंदे म्हणाले, शरद पवार आणि माझ्या मैत्रीत अनेकांनी घोळ घालण्याचा प्रयत्न केला,मात्र त्यामध्ये कोणाला यश आले नाही. कसे वागावे आणि कसे डावपेच करावेत याची शिकवण शरद पवारांनी आपणास दिली आहे. 


सोलापूर शहर उत्तरचे राष्ट्रवादीचे उमेदवार मनोहर सपाटे यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन मंगळवारी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी शिंदे बोलत होते.