महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून किल्याची साफसफाई : जिवती नगर पंचायत व गडचांदूर नगर परिषद चा स्तुत्य उपक्रम - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून किल्याची साफसफाई : जिवती नगर पंचायत व गडचांदूर नगर परिषद चा स्तुत्य उपक्रम

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : जिवती - संतोष इंद्राळे 


निसर्गाचे संरक्षण व संवर्धन व्हावे,पर्यावरणाविषयी जनजागृती व्हावी,या दृष्टिकोनातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून नगरपंचायत जिवती व नगरपरिषद गडचांदुर यांच्या वतीने स्वछ सर्वेक्षण 2020 अंतर्गत जिवती तालुक्यातील निसर्गाची देणं असलेल्या व ऐतिहासीक वारसा लाभलेला पुरातन माणिकगड किल्ला व प्राचीन विष्णुमंदिर परिसराची संपूर्ण स्वच्छता व साफसफाई करण्यात आली. 


यावेळी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी मा.डॉ.विशाखा शेळकी व सर्व नगरपंचायतिचे कर्मचारी, नगरसेवक,सामाजिक कार्यकर्ते, गावकरी,निसर्गप्रेमी यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

किल्या बद्दल थोडक्यात :गडचांदूर व जिवती मार्गावर हेमाडपंती विष्णूचे मंदिर व किल्ला आहे, वनस्पतीने नटलेल्या या किल्ल्यावर विष्णू मंदिराच्या दर्शनासाठी व किल्याचा आनंद घेण्यासाठी भाविक व पर्यटकांची वर्दळ वाढत आहे,पण येणाऱ्या भाविकांना व पर्यटकांना मनमोहक करण्यासाठी व खेळण्यासाठी सौंदर्यकरन व खेळाचे साहित्य, राहण्याची सोय,वीज,शुद्ध पाणी,आदींची व्यवस्था झाल्यास नक्कीच या पर्यटन स्थळाचा विकास होईल व पर्यटन व भाविकांना सोई-सुविधा मिळतील,याकडे पुरातन विभागाने लक्ष द्यावे असे तालुक्यातील नागरिकांचे म्हणने आहे.