फ्रेंड्स चैरिटी क्लब च्या सरिता मालू यांच्या पुढाकाराने एकलव्य निवासी शाळेत दांडियाचे आयोजन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

फ्रेंड्स चैरिटी क्लब च्या सरिता मालू यांच्या पुढाकाराने एकलव्य निवासी शाळेत दांडियाचे आयोजन

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा 

एकलव्य निवासी शाळा देवाडा येथे चारीटी क्लब चंद्रपूर च्या वतीने दांडिया चे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी क्लतर्फे विद्यार्थांना चॉकलेट वाटप करण्यात आले. आज देशात नवरात्र निमित्त दांडिया चे आयोजन सर्वत्र पाहायला मिळते. प्रत्येक लहान मोठ्या गावात सुद्धा दांडिया रास गरबा नृत्य करतात. 


मात्र चंद्रपूर येथील सरीता मालू यांचे चैरिटी क्लब चंद्रपूर यांचा पुढाकाराने एकलव्य निवासी शाळा देवाडा येते विद्यार्थां करिता गरबा नृत्याचा आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी शाळेतील विद्यार्थी सोबत शिक्षकानी सुद्धा या गरबा नुत्यात हिरहिरणे सहभाग नोंदविला. तसेच चैरिटी क्लब तर्फे मुलांना चॉकलेट वाटप करण्यात आले. 


या गरबा नृत्य प्रसंगी सरीता मालू, साधना चीडे, खुशी मालू, राधिका करीये, लक्ष सदलवर , रिधम सादलवर यांनी अप्रतिम गरबा नृत्य सादर केले. तसेच एकलव्य निवासी शाळेतील प्राचार्य रूपा बोरेकर,, शिक्षिका प्रांजली उंदिरवाडे, प्रेमलता बीसेन, अनुराधा मुंडे, अनुराधा बागलावे, प्रेरणा थुंबे, शिल्पा ढोये, मनीषा आवारी,यांनी सुद्धा आपले गरबा नृत्य कला सादर केले. विद्यार्थ्यांनी सुद्धा या गरबा दांडिया कार्यक्रमात सहभागी होऊन  आनंद लुटले.

     
या कार्यक्रमात चैरिटी क्लब चंद्रपूर कडून अध्यक्ष सरीता मालू, सदस्य चिडे, खुशी मालू, राधिका करिये, लक्ष सदलवार, इत्यादींची उपस्थिती होती. या प्रसंगी शाळेकडून चैरिटी क्लब चंद्रपूर कडून आलेल्या सदस्यांना भेट वस्तू देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.