राष्ट्रवादी काँग्रेस राजुरा तर्फे आघाडी धर्म पाळण्याची पत्रकार परिषदेत ग्वाही : कार्यकर्त्यांना विश्वासात न घेतल्याचा निमकरांवर आरोप - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राष्ट्रवादी काँग्रेस राजुरा तर्फे आघाडी धर्म पाळण्याची पत्रकार परिषदेत ग्वाही : कार्यकर्त्यांना विश्वासात न घेतल्याचा निमकरांवर आरोप

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर -राजुरा 


राजुरा विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार तथा प्रदेश सरचिटणीस सुदर्शनजी निमकर यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून न घेता भाजपा प्रवेश केला हे त्यांचे व्यतिक मतं असल्याने यांच्या प्रवेश हा व्यतिगत असून पक्षश्रेष्ठि जे निर्णय आहे त्यावर आम्ही ठाम असुन आघाडी धर्म पाळत आम्ही काम करणार -  महेमुद भाई मुसा,रा का जिल्हा उपाध्यक्ष 

निवडणुकीत काळात बंड पुकारत नेते व कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करतात  यांत काही शंका नाही निवडणुकीत मागील काळात राष्ट्रवादी काँग्रेस मधुनच अरुण धोटे हे पक्ष सोडून बी एस पी मध्ये गेले आता निमकर यांनी बी जे पी मध्ये प्रवेश केला असता तेव्हा व आज पक्षांवर कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही तरी पक्षक्षेष्ठी व आम्ही कार्यकर्ते वेळोवेळी येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करून पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत असेही ते म्हणाले.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस  जिल्हा पदाधिकारी रफिक निझामी चंद्रपूर प्रेमदास मेक्षाम, विठ्ठल कुसळे, शेख युनुस, सुरेंद्र सिंग राजुरा शहरातील तालुका अध्यक्ष संतोष देरकर, आषिश येदुरवार, नदीम मुसा, वसंत माणुसमारे, सोनु चाऊस, रवि भादीकर,अल्ताफ शेख व कार्यकर्ते उपस्थित होते.