आदर्श शाळेत " वाचन प्रेरणा दिन" संपन्न. - विध्यार्थीनी वेगवेगळी पुस्तके भेट देत व पुस्तकांचे वाचन करून डॉ. कलाम यांना केले अभिवादन. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आदर्श शाळेत " वाचन प्रेरणा दिन" संपन्न. - विध्यार्थीनी वेगवेगळी पुस्तके भेट देत व पुस्तकांचे वाचन करून डॉ. कलाम यांना केले अभिवादन.

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -


जागतिक किर्तीचे वैज्ञानिक, मिसाईल मॅन म्हणून विश्वख्याती असलेले , आदर्श शिक्षक, माजी राष्ट्रपती ,भारतरत्न ,डॉ ए. पि. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल , राजुरा च्या वतीने डॉ. कलाम यांच्या प्रतीमेला पुष्प अर्पणकरून तसेच  विध्यार्थी नी वेगवेगळ्या विषयांची पुस्तके शाळेला भेट देत व पुस्तकांचे वाचन करून अभिवादन केले. 


या निमित्ताने आदर्श प्राथमिक च्या मुख्याध्यापिका नलीनी पिंगे व हायस्कूल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर यांनी विध्यार्थीना मार्गदर्शन केले. जागतिक विद्यार्थी दिन तथा वाचन प्रेरणा दिन साजरा करतांना विध्यार्थीनी आजच्या युगात पुस्तकांना महत्व देत त्यांचे वाचन करण्याचे आवाहन  करण्यात आले.आणि आपल्या घरी स्वतःचे एक छोटे ग्रंथालय तयार करण्याचे सांगण्यात आले.मोबाईलचा अनावश्यक वापर टाळून आपले द्यान वाढ करतांना विविध पुस्तकांचे वाचन आपण केले पाहिजे असेही ते म्हणाले.
          
या प्रसंगी शाळेतील सहायक शिक्षिका ज्योती कल्लूरवार ,मेघा वाढई , अर्चणा मारोट्कर ,भाग्यश्री क्षीरसागर ,शिक्षक प्रशांत रागिट ,नवनाथ बुटले ,संतोष वडस्कर  यासह विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले यांनी केले.