ब्रह्मपुरीत विजय पताका संदीप गड्डमवारांच्या हातात? : वडेट्टीवारांना चिमूर नंतर ब्राम्हपुरीतूनही काढावा लागेल काय पळ ? - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रह्मपुरीत विजय पताका संदीप गड्डमवारांच्या हातात? : वडेट्टीवारांना चिमूर नंतर ब्राम्हपुरीतूनही काढावा लागेल काय पळ ?

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या काही निवडक विधानसभा क्षेत्रांपैकी ब्रम्हपुरी (73) या ठिकाणी आघाडीचे   विजय वडेट्टीवार विरुद्ध महायुतीचे संदीप गड्डमवार यांच्या विरुद्ध अत्यंत चुरशीचा सामना रंगला असून आघाडीत बिघाडी आणून धक्कादायक एक्सिट पोल समोर येत आहे.मतदानोत्तर अधिकांश एक्सिट पोल नुसार या  जागेवर  शिवसेना उमेदवार संदीप गड्डमवार यांच्या विजयाची शक्यता आहे.

ब्रम्हपुरी क्षेत्रातून एकूण 11 उमेदवारांचे राजकीय भविष्य 21ऑक्टोबर ला एकूण 270382 पैकी 186905(पोस्टल मतदान सोडून ) मतदान करत 69.13% मत इव्हीएम मधे नोंदीत असून,यामध्ये अपक्ष म्हणून प्रणव सोमनकर, विश्वनाथ श्रीरामे,अजय पांडव, विनय बांबोडे,इंडियन नॅशनल काँग्रेस कडून विजय वडेट्टीवार, आम आदमी पार्टीकडून ॲड. पारोमिता गोस्वामी, शिवसेना पक्षाकडून संदीप गड्डमवार, बहुजन वंचित आघाडी कडून चंद्रलाल मेश्राम,बहुजन समाज पार्टी कडून मुकुंदा मेश्राम, भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून विनोद झोडगे, संभाजी ब्रिगेड पार्टीकडून जगदीश पीलारे यांचा समावेश आहे.

मागील 2014निवडणुकीची मुख्य तिरंगी आकडेवारी विजय वडेट्टीवार (काँग्रेस )70000, अतुल देशकर (भाजपा ) 56000,संदीप गड्डमवार (राका )45000 लक्षात घेता या वेळेस अतुल देशकारांनी महायुती धर्म पाळत शिवसेनेचे उमेदवार असलेल्या संदीप गड्डमवार यांच्या खांद्यास खांदा लावून प्रचारात प्रचंड मेहनत घेतली असल्याचे सर्व ओठी असून संदीप गड्डमवार जरी ऐनवेळी राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेले असले तरीही त्यांच्या कुटुंबाची राजकीय पार्श्ववभूमी आधारित फार मोठी वैयक्तिक वोट बँक आहे.

उमेदवार शिवसेनेचे असले तरीही मुख्यमंत्र्यांचा उमदेवार म्हणून ख्याती मिळविलेले संदीप गड्डमवार यांना माजी शिवसैनिकाला धडा शिकवायची संधीचा पुरेपूर वापर करत ब्रम्हपुरी क्षेत्रातील शिवसेनेच्या अल्प प्रमाणात असलेली कार्यकर्ता वर्गाची संख्या ध्यानात घेता माजी संपर्क प्रमुख अजय स्वामी यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते व मुंबई हुन मदतीला 3संपर्क प्रमुखांना पाठविले होते.

भाजपच्या जेष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस, अतुल देशकर व कार्यकर्त्यांनी संदीप गड्डमवारांच्या सोबत अक्षरशः संपूर्ण क्षेत्र पिंजून काढत उमेदवारी नामांकन दाखल करताना पासूनच प्रचारात आघाडी घेतली होती.

शिवाय प्रचारात  नवीन चेहरा व स्थानिक उमेदवार या मुद्यावर संदीप गड्डमवार यांनी जम बसवित मागील पाच वर्षात विरोधात राहून विकासकामांना लागलेला ब्रेक, स्थानिक काँग्रेस च्या जेष्ठ नेत्यांची काँग्रेस उमेदवारांनी ओढवून घेतलेली नाराजगी व जिल्ह्यातील राजकारणात परिचित पुगलिया-वडेट्टीवार पक्षांतर्गत शीतयुद्धाचा परिणामार्थ पुगलिया गटाची पुन्हा एकदा सक्रियता वडेट्टीवारांना महागात पडण्याची पुरेपूर शक्यता असून आम आदमी पार्टीच्या उमेदवार पारोमिता गोस्वामी यांनी सुद्धा आदिवासी मुद्यावरून काँग्रेस उमेदवाराला चांगलाच घाम फोडला होता असे एकंदरीत चित्र होते.

उद्या 24ऑक्टोबर ला इव्हिएम मशीन उघडल्यानंतर, मतमोजणीत संदीप गड्डमवारच सरशी घेणार व वडेट्टीवारांना चिमूर नंतर आता ब्रम्हपुरीतूनही पळ काढावा लागेल? अशी खमंग चर्चा क्षेत्रातील गावोगावी रंगली आहे.