काँग्रेस ला वरोरा विधानसभा डोईजड : घराणेशाहीच्या विरोधात भद्रावती-वरोरा तालुक्यातील काँग्रेस चे सामूहिक राजीनामे - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

काँग्रेस ला वरोरा विधानसभा डोईजड : घराणेशाहीच्या विरोधात भद्रावती-वरोरा तालुक्यातील काँग्रेस चे सामूहिक राजीनामे

Share This
घराणेशाहीच्या निषेधार्थ अखेर भद्रावती-वरोरा तालुक्यातील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे सादर केले आहे. 
खबरकट्टा /चंद्रपूर :

निष्ठावंतांना डावलून काँग्रेस पक्षाने घराणेशाहीला अधिक महत्त्व दिल्याने काँग्रेसचे निष्ठावंत तथा वरोरा भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे ज्येष्ठ नेते विजय देवतळे यांना उमेदवारी न देता बाहेरून पक्षात आलेल्या लोकांना काँग्रेस पक्ष संधी देत असून निष्ठावंतांना डावलण्याचा प्रकार काँग्रेस मध्ये घडला. 
डॉक्टर विजय देवतळे यांनी उमेदवारी दाखल केली असून सर्व भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्राचे संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी आपला सामूहिक राजीनामा विश्वजित तांबे अध्यक्ष युवक कांग्रेस महाराष्ट्र प्रदेश यांना सादर केलाय. यापुढे आम्ही अपक्ष उमेदवार डॉक्टर विजय देवतळे यांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असा निर्धार वरोरा भद्रावती तालुक्यातील समस्त युवक काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी केला आहे. 

युवक कांग्रेस निवडणुकीत माझी विधानसभा उपाध्यक्ष पदावर नेमणूक करण्यात आली,त्यानंतर पक्षाचे वेळोवेळी प्रोग्रॅम योग्य पद्धतीने केलेत,महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या  चलो पंचायत अभियान हा कार्यक्रम विधानसभा क्षेत्रांत उत्तम रित्या केला.या अभियान कार्यक्रमात महाराष्ट्रत 5 मध्ये वरोरा नाव उज्ज्वल केले,आणि याच कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र  प्रदेश युवक काँग्रेसचे प्रांताध्य सत्यजित तांबे यांनी माझी विधानसभा युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदी नियुक्त केली होती परंतु आता निष्ठावंतांना डावलले जात असल्याने इथून पुढे काँग्रेस मध्ये काम करायची इच्छा नाही-संदीप दिडमिशे  


पक्षाला प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्त्याची  काही कदर नाही त्यामुळे आम्ही  सर्व युवक करकर्त्यासह कार्याध्यक्ष पदाचा व काँग्रेस  पक्षाचा प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा देत आहे  प्रांताध्यक्ष व जिल्हाअध्यक्ष यांनी मंजूर करावा अशी 1) विजय खिरटकर 2) तुळशी आलम 3) अतुल कोल्हे 4) प्रफुल्ल क्षिरसागर 5) चेतन महाजन 6) प्रशांत ढवळे 7) मंगेश बोढे 8) जगदीश गाढवे 9) किशोर केळझरकर 10) गुरुदेव हरणे 11) निखिल शेबलकर 12) केशव ताजने यांनी केली आहे.


वरिष्ठ पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी यावर काय निर्णय घेतात याकडे सर्व काँग्रेस प्रेमींचे लक्ष लागले आहे. येणारी निवडणूक काँग्रेसच्या उमेदवाराला जड जाईल हे मात्र नक्की झालं आहे.