विदर्भ महाविद्यालयात गांधी शांततेवर चर्चासत्र - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विदर्भ महाविद्यालयात गांधी शांततेवर चर्चासत्र

Share This
आज देशाला महात्मा गांधीजीच्या विचारांची नितांत गरज आहे  -प्रा.संजय मुंडे
खबरकट्टा /चंद्रपूर : जिवती- संतोष इंद्राळे 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जन्म शताब्दी निमित्त्याने विदर्भ महाविद्यालय जिवती येथील राज्यशास्त्र अभ्यास मंडळ व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने प्राचार्य डॉ. एस .एच. शाक्य यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात एक दिवशीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

चर्चासत्राचा विषय महात्मा गांधी यांचेअहिंसेचे  विचार हा होता चर्चासत्रामध्ये  मानवाने दुसर्यासोबत सहकार्याच्या भावनेने राहावे तसेच आज देशाला महात्मा गांधीजीच्या अहिंसेच्या विचारांची नितांत गरज आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. संजय मुंडे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात केले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. जयंत वासाडे यांनी महात्मा गांधी यांच्या ग्रामीण जीवनावर प्रकाश टाकला.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.संजय मुंडे प्रमुख मार्गदर्शक प्रा. जयंत वासाडे प्रमुख पाहुणे प्रा.लांडगे प्रा.जी एस राऊत होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीकांत पानघाटे यांनी केले तर आभार प्रा. चतुरदास तेलंग यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राज्यशास्त्र अभ्यास मंडळ व सांस्कृतिक  विभागाच्या सर्व सभासदांनी मोलाचे सहकार्य केले