निर्माणाधीन बांधकामाची भिंत कोसळून बांधकाम मजुराचा मृत्यू. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

निर्माणाधीन बांधकामाची भिंत कोसळून बांधकाम मजुराचा मृत्यू.

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा 
शहरातील इंदिरा नगर वॉर्ड येथे निर्माणाधीन घर बांधकामाची कच्ची भिंत कोसळून बांधकाम मजूर कमलेश वाघमारे (वय -45),राहणार रमानगर वॉर्ड राजुरा, याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.


आज दुपारी 2:30वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून भिंत प्लास्टर साठी बारीक रेती ची चाळणी करीत असताना अचानक ही भिंत कोसळल्याने वाघमारे यांना कोणतीही हालचाल करता अली नाही व गुदमरून बराच वेळ दबून राहिल्याने त्यांचा मृत्यू झाला.