चंद्रपूर अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी नदीत बुडून मृत : पोहायला जाने बेतले जीवावर - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी नदीत बुडून मृत : पोहायला जाने बेतले जीवावर

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :बल्लारपूर -


आज दिनांक 13ऑक्टोबर, सकाळी दहा ते अकरा वाजता  दरम्यान वर्धा नदी च्या गणपती घाटावर एक प्रेत नागरिकांना दिसून आले नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवले पोलिसांनी आपले चक्र फिरवून मृतकाची ओळख पटवली,मृतक करण विजय देवळे(21)हा चंद्रपूर अभियांत्रिकी महाविद्यालय मध्ये BE तृतीय वर्ष शिक्षण घेत होता,मूळचा पारडी तकमोर जिल्हा वाशीम येथील  रहवासी आहे शिक्षण घेण्यासाठी चंद्रपूर इथे बाबूपेठ इथे एका किरायाच्या  खोलीत4-5विद्यार्थी राहत होते.आपल्या मित्रां सोबत तो नजिक च्या हडस्ती पुला जवळ गेले असता वर्धा नदीत पोहण्या करीता उतरले पाण्याचा बहाव जास्त असल्याने पाच पैकी तिघेजण पाण्यात बुडल्याने दोघा ना वाचविण्यात आले आणि एक नदीत वाहतगेला त्याचे शव  बल्लारपूर वर्धा नदी गणपती घाट इथे मिळाले , माहिती मिळताच चंद्रपूर अभियांत्रिकी महाविद्यालय तील विद्यार्थी मृतक करण ला पाहण्या करिता अनेक विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.