नवरा-बायको-मुलांनी एकत्रित घरी बसून दारू पिल्याने होत नाही कलह ! : प्रचाराचे अजब परिपत्रक वायरल - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नवरा-बायको-मुलांनी एकत्रित घरी बसून दारू पिल्याने होत नाही कलह ! : प्रचाराचे अजब परिपत्रक वायरल

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : चिमूर - 

राज्यात विधानसभा निवडणुकांच्या अधिकृतपणे प्रचाराला सुरुवात झाली असून चिमूर-नागभीड(74) विधानसभा क्षेत्रातही उमेदवार आपण कसे योग्य हे मतदारांना पटवून देण्यात गुंतले आहेत.दरम्यान एका राजकीय पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात समाजात वाईट व्यसन समजल्या जाणाऱ्या दारूविषयी अजबच योजना राबविण्याचे जाहीर करण्यात आल्याने सद्या या प्रसिद्धीपत्रकाचे  कात्रण सोशल मीडियावर वायरल झाले असून हा चर्चेचा विषय झाला आहे. दारूबंदी समर्थक नेटकरी या वर कडवट प्रतिक्रिया तर विरोधक आमचे मत तुम्हालाच असं कमेंट करून ट्रोल करीत आहेत.

       
विद्यमान सरकारे चंद्रपूर जिल्ह्यात 1 एप्रिल 2015 पासून दारूबंदी लागू केली.कडक कायदे व पुरेश्या मनुष्यबळाअभावी जिल्ह्यात सर्वत्र पूर्वी पेक्षा तिप्पट भावानी दारू उपलब्ध आहे.मध्यतरी दारूबंदी हटविण्याची मागणी उठविण्यात आली. या वर जिल्ह्यात मोठं राजकारण सुरू आहे चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत 'दारू वाला की दूध वाला' हया मुद्द्यावर प्रचार करन्यात आला होता. 

जिल्ह्यात हे सर्व सुरू असतानाच राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजले व निवडणूक प्रक्रिया सुरू असून चिमूर विधानसभा क्षेत्रातीलअखिल भारतीय मानवता पक्षाच्या  उमेदवार वनिता जितेंद्र राऊत यांनी  'दारूबंदी हटलीच पाहिजे' अश्या आशयाने पत्रक प्रसिद्ध केले असून प्रसिध्दीपत्रकात मतदारांना आवाहन करतांना प्रकाशकाने अनेक खळबळजनक दावे केले असून आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिध्द करताना  दारू विषयक अनेक योजना जाहिर केल्या आहेत. 

     
या पत्रकात दारू पिणे ही सामाजिक प्रथा जाणवत असल्याचे सांगण्यात आले.दारुबंदीला सामाजिक मान्यता मिळत नसल्याने ती प्रत्यक्षात येवु शकत नाही तर यात त्यांनी क्षेत्रातील जनता चोरून-लपून व दुप्पट-तिप्पट भावानी खरेदी करून पीत असल्याने खंत व्यक्त करत सद्याच्या दारुबंदीवर पाप आहे अशी टीका केली आहे.दारूमुळे कुटुंब उध्वस्त होतात हा एक तर्क असून,नवरा-बायको,पोरं मिळून जसे खर्रा खातात तसेच एकत्र बसून दारू प्यायल्यास त्यांच्यात वाद होणार नाही.घरीच ऑम्लेट चखना खाऊन त्यांचे आरोग्य सुधारणार! असा आशावाद त्यांनी केला आहे.
    
त्यांनी यात सांगितलं की,लोक  सण-उत्सव नाचत-गाजत साजरे करत असून पर्यटन स्थळांना भेट देऊन कोंबडा-बकरा खाऊन तर लग्न-समारंभात डीजे वाजवून तर गंजीपा,चकलस अट्टू खेळत असतात.मनोरंजनात मग्न लोक बघून जनता सुखी संपन्न असल्याची खात्री त्यांनी व्यक्त केली. 


क्षेत्रातील तरुण, शेतकरी-शेतमजूर उदरनिर्वाह करून आनंदी आहेत. आणि या  आनंदी लोकांना दारू पिण्यापासून वंचित ठेवणे ही मोठी चूक असल्याचे तर आमदार म्हणून निवडून आल्यास दारूबंदी हटविण्यासह,गावा-गावातील बेरोजगार तरुणांना दारू विक्रीचे परवाने व गाव तिथे बियर बार ही योजना राबविण्यासह दारिद्र्य रेषेखालील लोकांना सवलतीत उपलब्ध करून देण्यार  यात  जाहीर केलं असून या बाबीचा नोंद घेऊन मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.