आदर्श शाळेत विविध संदेशांनी गरभा नवरात्रोत्सव संपन्न. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आदर्श शाळेत विविध संदेशांनी गरभा नवरात्रोत्सव संपन्न.

Share This
हेल्मेट चा वापर ,सेव गर्ल ,सेव बर्ड,सेव टायगर ,सेव वॉटर ,सेव ट्री चा दिला विध्यार्थीनी संदेश.

खबरकट्टा / चंद्रपूर :राजुरा -
6 ऑक्टोबर बालवीद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल येथे राष्ट्रीय हरित सेना विभागा मार्फत भव्य गरभा नवरात्रोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव भास्करराव येसेकर हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथि म्हणून मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर ,मुख्याध्यापिका नलीनी पिंगे ,स्पर्धेचे परीक्षक जयश्री धोटे,मेघा वाढई ,चटकि यांची प्रामुख्याने उपस्थिति होती. राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी इयत्ता पाचवी ते दहावी च्या विध्यार्थीनी उतस्पूर्थपणे सहभाग नोंदवला. 


स्पर्धेतील विध्यार्थी नी गरभा न्रूत्य करतांना विविध सामाजिक संदेश देऊन उपस्थितांचे लक्ष वेधले. त्यात त्यांनी दुचाकीने प्रवास करतांना हेल्मेटचा वापर करावा ,सेव टायगर्स ,सेव बर्ड, सेव ट्री ,सेव वॉटर ,सेव गर्ल ,बेटी बचाओ बेटी पढाओ , स्वच्छताही सेवा ,रक्त्दाण श्रेष्ठदान अशाप्रकारचे विविध संदेश दिले. या स्पर्धेत " किंग ऑफ आदर्श स्कूल " तेजस मेश्राम , " क्वीन ऑफ ए आदर्श स्कूल " धनश्री जनपल्लीवार हे ठरले तर प्रोत्साहनपर पारितोषिक रीधी आक्केवार ,पायल गजघाटे ,तनूशा चहारे यांना देण्यात आले.


विजेत्यांना आकर्षण सन्मानचिन्ह देऊन माण्यवराण्च्याहस्ते गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन व प्रास्तावीक बादल बेले यांनी केले. तर आभार प्रदर्शन गाईड यूनिट लिडर सुनीता कोरडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विध्यार्थीनी अथक परिश्रम घेतले.