क्षण शिवबंधनाचा : संदीप गड्डमवार शिवबंधनात - ब्रम्हपुरीतून वडेट्टीवार विरोधात लढणार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

क्षण शिवबंधनाचा : संदीप गड्डमवार शिवबंधनात - ब्रम्हपुरीतून वडेट्टीवार विरोधात लढणार

Share This

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा,भद्रावती शिवसेनेच्या कोट्यात आले असून अनेक चर्चा प्रतीक्षेनंतर मात्रोश्री वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चंद्रपूर जेष्ठ नेते नीलम गोऱ्हे,  अनिल देसाई, जिल्हामाजी संपर्क प्रमुख अजय स्वामी  यांच्या उपस्थितीत  राष्ट्रवादी चे संदीप गड्डमवार आज शिवबंधनात अडकले असून ब्रम्हपुरीसाठी संदीप गड्डमवार यांच्याकरिता विश्वासूंकडे  पूर्वीच एबी फॉर्म सुपूर्द करण्यात आला होता हे विषेश.

----------------------------------------------------------- खबरकट्टा / चंद्रपूर -


महाराष्ट्र विधानसभा 2019 साठी झालेल्या महायुतीच्या घोषणेनंतर शिवसेनेने  288 जागांपैकी शिवसेना कोट्यातील 124जागांची यादीजाहीर केली असून यात चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा,भद्रावती शिवसेने कडे असून जिल्ह्यातील शिवसेनेची ब्रम्हपुरी ही एक जागा वाढली आहे.

ब्रम्हपुरीसाठी संदीप गड्डमवार यांचेकडे एबी फॉर्म सुपूर्द झाला असल्याचे खात्रीलायक वृत्त असून पूर्वाश्रमीचे शिवसैनिक काँग्रेस चे विद्यमान गट नेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात ते रिंगणात असतील.

तर जागावाटपात वरोरा- वणी मतदार संघ फेरबदलीचाही पेच संपला असून लवकरच संजय देवतळे शिवबंधन बांधणार असे चिन्ह आहे. 
खालील फोटो वर टच करून पहा 124 जागांची संपूर्ण यादी...