आता ठरलंय -माघार नाही ! जोरगेवारांचा चंद्रपुरात वाढता जोर.!! : संडे मार्केट च्या 700दुकानदारांचे समर्थन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आता ठरलंय -माघार नाही ! जोरगेवारांचा चंद्रपुरात वाढता जोर.!! : संडे मार्केट च्या 700दुकानदारांचे समर्थन

Share This
-संडे मार्केट येथील ७०० दुकानदारांचे किशोर जोरगेवार यांच्या नावाला समर्थन 
खबरकट्टा / चंद्रपूर : 
'तुम्ही निवडणूक लढा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत' असा विश्वास आज संडे मार्केट येथील ७०० दुकानदारांनी यंग चांदा ब्रिगेडचे अध्यक्ष किशोर जोरगेवार यांना दिला आहे. आज (रविवार) चंद्रपूर येथील आंबेडकर पुतळा येथे किशोर जोरगेवार यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी सत्कारासाठी किशोर जोरगेवार यांची उपस्थिती होती तसेच संडे मार्केटचे अध्यक्ष राजा शेख, इर्शाद शेख, रामगोपाल पांडे, हमीद भाई, श्रावण भारती, किरण ताई, रमाबाई यांच्या सह शेकडो मान्यवर उपस्थित होते. यावेळी तेथील दुकानदारांनी वरील नारा देत किशोर जोरगेवार यांच्या नावाला समर्थन दिले.

किशोर जोरगेवार यांनी जनतेसाठी काम केले आणि जनतेला देखील हे माहित आहे. मात्र काही राजकीय घडामोडींमुळे त्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागत आहे तरी देखील तुम्ही पुढे जा आम्ही तुम्हाला पूर्ण पाठींबा देवू असे येथील दुकानदारांनी म्हटले आहे. 
किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर शहरात अनेक महत्वाचे आंदोलन आणि जनहितार्थ मोर्चे काढले. चंद्रपूरकरांसाठी त्यांनी खरोखर लोकसेवा केली आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या सदैव पाठीशी आहोत अशा भावना यावेळी येथील दुकानदारांनी व्यक्त केल्या.