भोंगळ कारभार इथेही : निवडणुकीच्या यादीतून "आप" चे चुनाव चिन्ह "झाडू" बेपत्ता : 50उमेदवार रिंगणात - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

भोंगळ कारभार इथेही : निवडणुकीच्या यादीतून "आप" चे चुनाव चिन्ह "झाडू" बेपत्ता : 50उमेदवार रिंगणात

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र :

विधानसभा निवडणुकीत यंदा आम आदमी पक्षानी राज्यातून आपले 50 उम्मेदवार लावण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.मागच्या वर्षीच आप पक्षाने या करिता आपला निवडणुक चिन्ह “झाडू” याची रितसर नोंद पण केली होती.

परंतु नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुक विभागात लागलेल्या फलकावर राष्ट्रीय व राज्य स्तरीय राखीव चिन्हांच्या यादीतच आम आदमी पक्षाचा निवळणूक चिन्ह “झाडू” हा पूर्णपणे बेपत्ता आहे.विशेष म्हणजे स्वतंत्र किंवा अपक्ष उमेदवारांचा निवडणुक चिन्हांच्या यादीत पण आप पक्षाचा निवळणूक चिन्ह “झाडू” बेपत्ता आहे.

राज्य सरकार व निवडणुक आयोगाच्या या भोंगळ कारभारामुळे आम आदमी पक्षाचा सर्व उमेदवारांचा व मतदारांच्या पुढे एक मोठा यक्ष प्रश्न निर्माण उभा झाला आहे.

आम आदमी पक्षाचे नागपूर येथील कार्यकर्ते राजेश पौनीकर यांनी शुक्रवारी निवडणुक निर्णय अधिकारी,जिल्हाधिकारी कार्यालय नागपुर यांच्याकडे त्वरितच लेखी तक्रार केली व निवडणुक आयोगाच्या या भोंगळ कारभाराकडे लक्ष वेधले आहे.

त्यांनी आरोप लावले आहे कि निवडणुक चिन्हांच्या यादीत राज्य सरकार व निवडणुक आयोगानी भयंकर मोठी चूक जाणून केलेली आहे.श्री पौनीकर यांनी सरकार व निवडणुक आयोगाच्या या चुकीवर संज्ञान घेऊन निवडणुक निर्णय अधिकारी कडे या प्रकरणाची त्वरीत चौकशी व त्यांचे अभिमत देण्याची लेखी मागणी केली आहे.