गडचांदूर नगर परिषद निवडणुकीची प्रभागनिहाय आरक्षण सोडत 5नोव्हेंबर ला : - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गडचांदूर नगर परिषद निवडणुकीची प्रभागनिहाय आरक्षण सोडत 5नोव्हेंबर ला :

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :  


चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव तालुक्याचे ठिकाण नसलेली कोरपना तालुक्यातील सर्वात गडचांदूर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी प्रभाग रचनेला मान्यता प्रदान केली असून येत्या 5 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता न.प.कार्यालय येथे आरक्षण सोडत होणार आहे.


आनुसूचित जाती,अनुसूचित जमाती महिला नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला यांचे आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित करण्यात येणार आहे.योगेश कुंभेजकर उपविभागीय अधिकारी राजूरा यांच्या अध्यक्षतेखाली सदर आरक्षण सोडत होणार असून यावेळी गडचांदूर न.प.क्षेत्रातील इच्छुकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.