कोहपरा येथील 40 ते 50 युवकांचा शेतकरी संघटनेत प्रवेश - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कोहपरा येथील 40 ते 50 युवकांचा शेतकरी संघटनेत प्रवेश

Share This
-भाजपाच्या कार्यकर्त्यांचा शेतकरी संघटनेत प्रवेश

गेल्या काही दिवसापासून राजुरा विधानसभेतील वातावरण हे  अ‍ॅड. वामनराव चटप यांच्या प्रचाराने उत्साहवर्धक झाले आहे. वामनराव चटप यांचे जूने सहकारी परत जोमाने त्यांचा प्रचार करत आहे. तर अनेक नवे युवक देखील त्यांच्या नेतृत्वाने भारावून जुळताना दिसत आहे. 
दरम्यान आज राजुरा येथे अ‍ॅड.वामनराव चटप यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेला हजारो नागरिकांची उपस्थिती लावली. अ‍ॅड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत यावेळी कोहपरा गावातील 40 ते 50 युवकांनी शेतकरी संघटनेत प्रवेश केला.

यातील लोकेश ठोंबरे ,शुभम पिंगे, वसंता विद्दे, बंडू कुळमेथे ह्या युवकांनी काही दिवसांआधी भाजपामध्ये प्रवेश केला होता. परंतु, भाजपा पक्षाची विचारप्रणाली व कार्यपद्धती न आवडल्याने वामनराव चटप यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्या युवकांनी शेतकरी संघटनेत प्रवेश केला आहे.* त्यासोबतच हेमंत पिंगे, प्रशांत खोपरे, गौरव इसनकर,  पंकज विड्डे,  प्रज्वल मडावी, सुशांत मुसळे, अतुल ढुमणे, मुरलीधर मडावी, सोमेश्वर कोपरे, रामचंद्र ठोंबरे, मुकेश मडावी, नितीन पिंगळे, गणेश गंदफाडे, संतोष पिंगे, बबन मुसळे,गणेश वाढई, मोरेश्वर वांढरे, ज्ञानेश्वर वाटेकर, सतीश वांढरे, सुधाकर बोडे, प्रफुल मडावी आदी युवकांनी शेतकरी संघटनेत प्रवेश घेतला असून यावेळी वामनराव चटप यांना प्रचंड बहुमताने विजय करण्याचा ध्यास युवकांनी घेतला. 

याप्रसंगी सर्व युवकांचे स्वागत वामनराव चटप यांनी केले. तर विशेष अतिथी म्हणून अ‍ॅड. मुर्लीधर देवाळकर, नगरसेवक मधुकर चिंचोलकर, पंढरी बोंडे, शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते दिनकर डोहे, नरेंद्र काकडे, अ‍ॅड.विनोद देवाळकर, कपिल इद्दे, निरज मत्ते, स्वप्निल पहानपटे आदी लोक उपस्थित होते.