ब्रेकिंग न्यूज : राष्ट्रवादीचे सुदर्शन निमकर भाजपात ! - राष्ट्रवादीच्या सर्व पदांसहित प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग न्यूज : राष्ट्रवादीचे सुदर्शन निमकर भाजपात ! - राष्ट्रवादीच्या सर्व पदांसहित प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

Share This
"आघाडीत बिघाडी : निमकरांच्या भाजपा प्रवेशाचा निघालाय मुहूर्त : गडचांदूरच्या नगराध्यक्षा सहित 3 नगरसेवक व 250राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केला प्रवेश"

खबरकट्टा / चंद्रपूर :राजुरा -
काल रात्री उशिरापर्यंत सुदर्शन निमकर तसेच सुधीर मुनगंटीवार, संजय धोटे, हरीश शर्मा आणि इतर प्रमुख नेत्यांशी झालेल्या चर्चेअंती राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी कुठल्याही अटी शर्ती न ठेवता भारतीय जनता पक्षात विनाशर्त प्रवेशाची घोषणा केली आहे.

जिल्ह्यात राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाला एकही ठिकाणी उमेदवारी दिलेली नाही त्यामुळे राजुरा विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांमध्ये पक्षांबद्दल रोष असल्याने चारही तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या असता आघाडी पक्षाकडून सन्मानपुर्वक वागणूक मिळत नसल्याने सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्याच्या प्रतिक्रिया आल्याने कार्यकर्त्याच्या भावना लक्षात घेऊन राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा देत येत्या काही दिवसात भाजपा पक्ष प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
  
ह्याच घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर गडचांदूर नगर पंचायतीच्या अध्यक्षा विजयालक्ष्मी डोहे ह्यांनी तिन नगरसेवक आणि कोरपना तालुक्यातील गावोगावच्या 250 कार्यकर्त्यांसह चंद्रपूर येथे सुधीर मुनगंटीवार,ऍड संजय धोटे व भाजपा राजुरा चे जेष्ठ नेते अरुण मस्की  ह्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

राजुरा क्षेत्रात निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा पक्षाध्यक्ष तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ह्यांच्या उपस्थितीत सुदर्शन निमकर आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले असुन आतापासूनच ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपाचा प्रचार सुरू करणार आहेत.काल रात्री उशिरापर्यंत सुदर्शन निमकर तसेच सुधीर मुनगंटीवार, संजय धोटे, हरीश शर्मा आणि इतर प्रमुख नेत्यांशी झालेल्या चर्चेअंती राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी कुठल्याही अटी शर्ती न ठेवता भारतीय जनता पक्षात विनाशर्थ प्रवेशाची घोषणा केली आहे.ह्यावेळी राजुरा तालुकाध्यक्ष हरिदास झाडे, केशव ठाकरे, संजय वडस्कर, श्रीधर गोडे, सुरेश पावडे, उत्तम मोहितकर, पुरुषोत्तम अस्वले, रामभाऊ देवईकर, संजय पावडे, आदित्य भाके, नितीन बांब्रटकर, विठ्ठल येवले, नितीन मुसळे काशिनाथ गोरे आणि अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.