प्रकाश पाटील मारकवार भाजपात दाखल : 2दिवसांपूर्वीच दिला होता काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष पदाचा पत्रकार परिषदेत राजीनामा - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

प्रकाश पाटील मारकवार भाजपात दाखल : 2दिवसांपूर्वीच दिला होता काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष पदाचा पत्रकार परिषदेत राजीनामा

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
कॉंग्रेसचे नेते तथा जिल्‍हा परिषदेचे माजी अध्‍यक्ष प्रकाश पाटील मारकवार यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला. त्‍यांच्‍यासह राजगडचे माजी सरपंच प्रविण वालदे, रूपेश मारकवार आणि मोहन शांतनवार यांनीही भाजपात प्रवेश घेतला. विधानसभा निवडणूकीच्‍या तोंडावर कॉंग्रेसला मोठे खिंडार पडले आहे.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रकाश पाटील मारकवार यांचे पक्ष प्रवेशाबाबत स्‍वागत केले. यावेळी माजी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर, आ. नानाजी शामकुळे, जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष देवराव भोंगळे, समाजकल्‍याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, महापौर अंजली घोटेकर, मनपा सदस्‍य सुभाष कासनगोट्रटूवार, मधुसुदन रूंगठा आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.


देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली अभूतपूर्व विकासकामे व त्‍या माध्‍यमातुन भारताचा बलशाली राष्‍ट्र बनण्‍याच्‍या दृष्‍टीने सुरू असलेला प्रवास याने आपण प्रचंड प्रभावित झालो असून पंतप्रधानांच्‍या सबका साथ, सबका‍ विकास या सुत्रानुसार मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेला राज्‍याचा व चंद्रपूर जिल्‍हयाचा विकास याने प्रभावित होवून त्‍यांच्‍या नेतृत्‍वावर विश्‍वास ठेवत आपण भाजपात प्रवेश केला असून यापुढील काळात भाजपाच्‍या माध्‍यमातुन लोककल्‍याण व विकास हेच आपले ध्‍येय राहील, असे प्रकाश पाटील मारकवार म्‍हणाले. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर व मान्‍यवरांनी प्रकाश पाटील मारकवार यांना अभिनंदनपर शुभेच्‍छा दिल्‍या.