अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या पीकनुकसानीचे पंचनामे तातडीने 1नोव्हेंबर पर्यंत सादर करण्याचे राजुरा तहसीलदार यांचा आदेश - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या पीकनुकसानीचे पंचनामे तातडीने 1नोव्हेंबर पर्यंत सादर करण्याचे राजुरा तहसीलदार यांचा आदेश

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :


चंद्रपूर जिल्ह्यात जुलै ते ऑक्टोबर 2019 या दरम्यान अतिवृष्टी व पुरामुळे शेतपिकाचे 33%किंवा अधिकचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना घेतलेल्या पीककर्जाची माफी व पीककर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांना 1हेक्टर च्या मर्यादेत च्या दराच्या तिप्पट मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

सदर निर्णयानुसार बाधित शेतकऱ्यांना पीकनुकसानीसाठी मदत देण्याकरिता ग्रामस्तरावर तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांची त्रिसदस्सीय समिती गठीत करून, या समितीला संयुक्तिक स्वाक्षरीने व सरपंच तथा गावातील सन्माननीय नागरिक यांच्या साक्षीने दिनांक 1 नोव्हेंबर 2019पर्यंत पंचनामे,फोटो सहित तातडीने सादर करण्याचे आदेश डॉ रवींद्र होळी, तहसीलदार राजुरा यांनी दिले आहेत. 



गावनिहाय या समितीच्या अधिकाऱ्यांना भेटून शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या पीक नुकसानुची माहिती देत पाहणी करून घ्यावा असे आवाहन केले आहे.