1नोव्हेंबर पासून देशभरात बॅंकांच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळात बदल - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

1नोव्हेंबर पासून देशभरात बॅंकांच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळात बदल

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
केंद्र सरकारच्या ईज २.० अन्वये बैंकिंग मधील सुधारणांच्या अंतर्गत भारतीय बैंकिंग संघटनेने ग्राहकाकरीता सार्वजनिक बँकांच्या कामकाजाच्या वेळा आता एकसमान केले आहेत. भारतीय बँकिंग संघटनेने त्यांच्या ग्राहकांसाठी देशामधील बैंकिंग वेळेचे तीन संच वजा पर्याय केले असून ते आता देशभरात लागू होतील. राज्यस्तरीय बँकर्स समितीने भारतीय बैंकिंग संघटनेचा आदेश आणि जिल्हा बँक व्यवस्थापकांनी प्रत्येक सार्वजनिक बँकेने सुधारित केल्यानुसार जिल्हयातील सार्वजनिक बँकासाठी कामकाजाच्या वेळेचे तीन संच सूचित केले आहेत.

बँक व शाखा निहाय कामकाजाच्या वेळेचा तपशिल संबंधित बँकाच्या संकेतस्थळावर अवलोकनार्थ उपलब्ध करून देण्यात आला आहे.

रहिवासी क्षेत्रातील सर्वाजनिक बँकाची वेळ सकाळी ९ ते दुपारी ४ अशी आहे. आता ती ग्राहकासाठी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत राहिल. व्यापारी क्षेत्रातील बँकाची वेळ सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजे पर्यंत आहे. ग्राहकांसाठी ही वेळ सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत राहिल. क्षेत्रीय व इतर कार्यालयाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजे पर्यंत आहे. ती आता सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत राहणार आहे. बँक व शाखा निहाय कामकाजाच्या वेळेचा तपशिल संबंधित बँकाच्या संकेतस्थळावर अवलोकनार्थ उपलब्ध करून देण्यात आला आहे. वेळापत्रकानुसार प्रत्येक शाखेने त्यांच्या कामकाजाच्या वेळा सूचना फलकाद्वारे प्रसिध्द कराव्यात.असे सुचित करण्यात आले आहे.