जिल्ह्यात माघार 19 उमेदवारांची : राजुरा-चंद्रपूर-चिमूर 4 ; बल्लारपूर-ब्रम्हपुरी 3 तर वरोरा येथून 1ची माघार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्ह्यात माघार 19 उमेदवारांची : राजुरा-चंद्रपूर-चिमूर 4 ; बल्लारपूर-ब्रम्हपुरी 3 तर वरोरा येथून 1ची माघार

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : 


राज्यात 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. 5 ऑक्टोबर 2019 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील 110 पैकी 90 उमेदवारांचे अर्ज निवडणुकीसाठी पात्र ठरविण्यात आले होते. 90 उमेदवारांपैकी 19 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून आता जिल्ह्यात एकूण 71 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.

राजुरा मतदारसंघातून 16 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरवण्यात आले होते. यापैकी  4 उमेदवारांनी  स्वतःची उमेदवारी अर्ज मागे घेतले असून  राजुरा मतदारसंघात एकूण 12 उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे. यामध्ये अपक्ष म्हणून जयराम चरडे, रेशमा चव्हाण, शामराव सलाम, संतोष येवले, अनिल सिडाम, तसेच इंडियन नॅशनल काँग्रेस कडून सुभाष धोटे, स्वतंत्र भारत पक्षाकडून वामनराव चटप, बहुजन समाज पार्टी कडून भानुदास जाधव, गोंडवाना गणतंत्र पार्टी कडून गोदरू जुमनाके, भारतीय जनता पार्टी कडून ॲड. संजय धोटे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून महालिंग कंठाळे, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया कडून प्रवीण निमगडे हे उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीत उतरतील. अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांमध्ये भारत आत्राम, रामराव चव्हाण, तुकाराम पवार, पंकज पवार यांचा समावेश आहे.
            
चंद्रपूर मतदारसंघातून 16 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. यापैकी 4 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून प्रत्यक्ष 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे. यामध्ये अपक्ष म्हणून संदीप पेटकर, तथागत पेटकर, किशोर जोरगेवार, मंदिप गोरडवार, तसेच भारतीय जनता पार्टी कडून नानाजी शामकुळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कडून बबन रामटेके, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया कडून नामदेव गेडाम, इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाकडून महेश मेंढे, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया कडून अमृता गोगुलवार, बहुजन वंचित आघाडी कडून अनिरुद्ध वनकर, बहुजन समाज पार्टी कडून सुबोध चूनारकर, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी कडून ज्योतीदास रामटेके हे उमेदवार प्रत्यक्ष चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवणार आहेत. अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांना मध्ये ज्योती रंगारी, प्रियदर्शन इंगळे, सुधाकर कातकर, हरिदास लांडे यांचा समावेश आहे.
        
बल्लारपूर मतदारसंघातून 16 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. यापैकी 3उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून एकूण 13उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. यामध्ये अपक्ष म्हणून बंडू वाकडे, अशोक तुमराम, सागर राऊत, तारा काळे,अनेकश्वर मेश्राम, तसेच गोंडवाना गणतंत्र पार्टी कडून मनोज आत्राम,बहुजन समाज पार्टी कडून सरफराज शेख, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कडून अरुण कांबळे, इंडियन नॅशनल काँग्रेस कडून डॉ. विश्वास झाडे, आम आदमी पार्टीकडून ताहेर हुसेन,भारतीय जनता पक्षाकडून सुधीर मुनगंटीवार, वंचित बहुजन आघाडी कडून राजू झोडे, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया कडून सचिन टेंभुर्णे हे उमेदवार बल्लारपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांना मध्ये नितीन भटारकर, संजय गावंडे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेंद्र वैद्य यांचा समावेश आहे.
            
ब्रह्मपुरी मतदारसंघातून 14 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. यापैकी 3उमेदवारांनी स्वतःची उमेदवारी अर्ज मागे घेतले असून आता एकूण 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. यामध्ये अपक्ष म्हणून प्रणव सोमनकर, विश्वनाथ श्रीरामे,अजय पांडव, विनय बांबोडे,इंडियन नॅशनल काँग्रेस कडून विजय वडेट्टीवार, आम आदमी पार्टीकडून ॲड. पारोमिता गोस्वामी, शिवसेना पक्षाकडून संदीप गड्डमवार, बहुजन वंचित आघाडी कडून चंद्रलाल मेश्राम,बहुजन समाज पार्टी कडून मुकुंदा मेश्राम, भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून विनोद झोडगे, संभाजी ब्रिगेड पार्टीकडून जगदीश पीलारे हे उमेदवार ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून प्रत्यक्ष निवडणूक लढणार आहे. अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांनामध्ये वसंत वाजुरकर, धानु वलथरे,दिलीप शिवरकर यांचा समावेश आहे.
         
चिमूर मतदारसंघातून14 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. यापैकी 4 उमेदवारांनी स्वतःची उमेदवारी अर्ज मागे घेतले असून आता एकूण 10उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात  उतरलेले आहे. यामध्ये अपक्ष म्हणून कैलास बोरकर, अजय पिसे, धनराज मुंगले, हरिदास बारेकर, तसेच अखिल भारतीय मानवता पक्षाकडून वनिता राऊत,इंडियन नॅशनल काँग्रेस कडून सतीश वाजुरकर, बहुजन वंचित आघाडी कडून अरविंद सांदेकर, बहुजन समाज पार्टी कडून सुभाष पेटकर, भारतीय जनता पार्टी कडून किर्तिकुमार भांगडीया, भारतीय शेतकरी कामगार पक्ष कडून प्रकाश नान्हे हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात प्रत्यक्ष उतरणार आहेत. मागे घेतलेल्या उमेदवारांमध्ये गजेंद्र चाचरकर,अमृत नखाते, किशोर घोनमोडे,रमेशकुमार गजबे यांचा समावेश आहे.
            
वरोरा विधानसभा मतदारसंघातून 14 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. यापैकी एका उमेदवाराने  अर्ज मागे घेतलेला असून आता एकूण13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात  उतरलेले आहे. यात अपक्ष म्हणून डॉ. विजय देवतळे, प्रवीण गायकवाड,अशोकराव घोडमारे, प्रवीण सुराणा, इंडियन नॅशनल काँग्रेस कडून प्रतिभा धानोरकर, वंचित बहुजन आघाडी कडून अमोल बावणे, संभाजी ब्रिगेड कडून उत्तम ईश्वर इंगोले, बहुजन समाज पार्टी कडून प्रशांत भडगरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून रमेश राजूरकर,बहुजन विकास आघाडीकडून अशरफ खान, शिवसेना पक्षाकडून संजय देवतळे,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कडून भास्कर डेकाटे, गोंडवाना गणतंत्र पार्टी कडून रमेश मेश्राम हे उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये भाग घेणार आहे. पक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल केलेले अंकुश आगलावे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे.