18 ऑक्टोबर ला केंद्रीय गृह मंत्री अमित शाहा यांची राजुरा येथे सभा - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

18 ऑक्टोबर ला केंद्रीय गृह मंत्री अमित शाहा यांची राजुरा येथे सभा

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -

भाजपाचे नेते, केंद्रीय गृहमंत्री हे राजुरा विधानसभा क्षेत्राचे भारतीय जनता पार्टी - शिवसेना व इतर युतीचे उमेदवार ऍड.संजय धोटे यांच्या  प्रचारार्थ 18 ऑक्टोबर रोजी दुपारी दुपारी 1वाजता राजुरा येथे प्रचार सभेला संबोधित करतील.

नियोजित दौऱ्या नुसार तत्पूर्वी अहेरी विधानसभा क्षेत्राचे उमेदवार राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांच्या प्रचारार्थ अहेरी येथे दुपारी 12 वाजता प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे.

सकाळी 10:20 वाजता नागपूर येथे दाखल होतील 10:30 वाजता हेलिकाॅप्टरने अहेरीकडे प्रयाण करतील. 11:50 वाजता अहेरी येथे दाखल होतील. दुपारी 1 वाजता प्रचार सभेला संबोधित करतील. दुपारी 1.05 वाजता हेलिकाॅप्टरने राजुराकडे प्रयाण करतील. अहेरी येथे प्रचार सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. प्रचार सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे.