आक्षेपार्य पोस्ट आढळल्याने 17व्हाट्स अप ग्रुप ला सायबर सेल ची नोटीस - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आक्षेपार्य पोस्ट आढळल्याने 17व्हाट्स अप ग्रुप ला सायबर सेल ची नोटीस

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर


सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक आक्षेपार्ह मुजकुराद्वारे आचारसंहितेचा भंग करण्यात येत आहे, असे पोलीस विभागाचे निदर्शनास आले. उमेदवारांचे सर्व सोशल मीडियावर अकाउंट यासाठी तपासले जात आहे याशिवाय निवडणूक काळात अपप्रचार करणाऱ्या 17 व्हाट्सअप ग्रुप तसेच त्या ग्रुपमधील सदस्यांना कलम 149 अन्वये नोटीस बजावली आहे.


फेसबुक वरील "गॅंग ऑफ चंद्रपूर" या प्रोफाईलवर काही आक्षेपार्ह पोस्ट आढळून आल्या. या प्रोफाइल संबंधित असलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे. 

आचारसंहितेची काटेकोर पालन व्हावे, यासाठी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून अनेक बंधने घातल्या गेली आहे. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक आक्षेपार्ह पोस्ट व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब यावर शेअर केल्या जात आहेत. अशा पोस्ट द्वारे सामाजिक वातावरण बिघडण्याची दाट शक्यता असल्याने पोलीस विभागाच्या सायबर सेलने सदर कारवाई केली आहे. यासंदर्भात काही तक्रारी प्राप्त झाल्या असून अनेक व्हाट्सअप ग्रुप, फेसबुक अकाउंट रडारवर असून चौकशीसाठी पाचारण केले जाणार आहे.