जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत 15डिसेंबर ला - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत 15डिसेंबर ला

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :


मिनी मंत्रालय ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाची आरक्षण सोडत येत्या 15 डिसेंबरला होणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर  जिल्हा परिषदेतील राजकारनाची धुरा सुद्धा आता बदलणार आहे.
सध्या चंद्रपूर जिल्हा परिषदेत एकूण 56सदस्यांपैकी 36 भाजपा तर 20काँग्रेस चे सदस्य आहेत.
दरम्यान 15 डिसेंबरला होणाऱ्या आरक्षण सोडतीनंतर जिल्हा परिषदेतील राजकारणाची दिशा नेमकी काय राहणार हे स्पष्ट होणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीत युतीची पिछेहाट झाली आहे. त्यामुळे काँग्रेस आघाडीचा विश्वास दुणावला आहे तरीही मिनिमंत्रलयात स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपाचीच सत्ता पुन्हा असणार असून आरक्षणानुसार अध्यक्ष अध्यक्ष कोन बनेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.