आ. राजे अंम्ब्रीशराव आत्राम यांचे भाजपच्या 125 उमेदवारांच्या यादीतून बेदखल ! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आ. राजे अंम्ब्रीशराव आत्राम यांचे भाजपच्या 125 उमेदवारांच्या यादीतून बेदखल !

Share This
खबरकट्टा / गडचिरोली-अहेरी - 


भाजप-शिवसेनेत युती झाल्याने कित्तेक आजी माजी मंत्र्यांना चांगलाच फटका बसला आहे. यातच येन निवडणुकीच्या वेळी भाजपात प्रवेश करून उमेदवारी मिळाल्याने वर्षानुवर्षापासून भाजपासाठी काम करणाऱ्यांनाच घरचा अहेर मिळाल्याचे दिसून येत आहे. यामुळे कित्तेक कार्यकर्ते, विद्यमान मंत्री सह आमदार खासदारांकडून नाराजी व्यक्त केल्या जात आहे. 

तसेच काहींनी तर पक्ष सुद्धा सोडलं आहे. आज जाहीर झालेल्या भाजपच्या 125 च्या यादीत 2014 च्या निवडणुकीत विजय झालेल्या उमेदवारांना उमेदवारी न मिळाल्याने भाजपात काम करणाऱ्या नेत्यांना याचाच फटका बसल्याचे समजते. यात प्रकाश मेहता, राजकुमार बडोले, दिलीप कांबळे, विष्णू सावरा आणि राजे अंम्ब्रीशराव आत्राम यांचा समावेश नाही. त्यामुळे आता भाजप या मतदार संघात कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

तसेच अहेरी विधानसभा क्षेत्रासाठी भाजपाची उमेदवारी मिळावी यासाठी तीनही आत्रामांनी कसून होड लावली. मात्र यादीत नाव जाहीर न झाल्याने आता कोणता झेंडा घेऊन बारशिंगे बांधाव हे कळत नसल्यासारखे झाले आहे. येणाऱ्या काही दिवसात या मतदार संघात कोणत्या उमेदवाराला भाजपाकडून उमेदवारी मिळते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.