एकनाथ खडसेंना मोठा धक्का : भाजपच्या 125उमेदवार यादीत नाव नाही ! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

एकनाथ खडसेंना मोठा धक्का : भाजपच्या 125उमेदवार यादीत नाव नाही !

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र :

भाजपने आज दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी दिल्लीतल्या भाजप मुख्यालयातून महाराष्ट्र विधानसभेकरिता 125  उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. 


यामध्ये भाजपचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांना स्थान मिळालं नाही. एकनाथ खडसेंसाठी हा मोठा धक्का मानण्यात येत आहे. जळगावच्या मुक्ताईनगर मतदारसंघातून त्यांची उमेदवारी अपेक्षित आहे. मात्र त्यांच्याऐवजी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

रोहिणी खडसे सध्या जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा आहेत. एकनाथ खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्याने त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. नंतर झोटिंग समितीने त्यांची सखोल चौकशी केली आणि त्यांना क्लिनचिटदेखील दिली. परंतू त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही. दरम्यान, गेल्या 3 ते 4 वर्षात एकनाथ खडसे यांची नाराजी लपून राहिलेली नाही. त्यामुळे मुक्ताईनगरमध्ये भाजप कोणाला तिकीट देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.