एमडीआर मॉल मध्ये मोठी चोरी : 10लाख पेक्षा अधिक किमतीचे दागिने जप्त : मॅनेजरच निघाला सूत्रधार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

एमडीआर मॉल मध्ये मोठी चोरी : 10लाख पेक्षा अधिक किमतीचे दागिने जप्त : मॅनेजरच निघाला सूत्रधार

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :


चंद्रपूर स्थित एकमेव शॉपिंग मॉल व मल्टीपेक्स येथे मालक दिनेश चोरडिया यांच्या व्यक्तिगत खात्याच्या 5धनादेश गहाळ होऊन 3चेक चा वापर झाल्याची तक्रार जिल्हा पोलिसांकडे केली होती. जिल्हा पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ स्थानिक पोलीस विभागाकडे प्रकरण वर्ग करून चेक वंटलेल्या ठिकाणी चमू पाठविली.सदर 5पैकी 3धनादेश अमरावती येथील 3वेगवेगळ्या सराफ दुकानांमध्ये खोट्या सहीनिशी वापरून 10लक्ष 37हजार किमतीच्या सोन्याची आभूषणे खरेदी करण्यात आली.स्थानिक पोलीस शाखेच्या चमूने 3दिवसांपूर्वी एका आरोपीला अटक केली असता, एमडीआर मॉल मध्ये काम करणारा मॅनेजर खरा सूत्रधार आहे कळताच तात्काळ 3लोकांना अटक केली असून आरोपीने सदर धनादेश वापरकरताना दोन मोबाईल क्रमांक सुद्धा चोरडिया यांचा फोटो वापरून बनावट पॅन कार्ड चा वापर केला हे धक्कादायक.