सोशल मीडिया चा गैरवापर रोखण्याकरिता तीन आठवड्यात यंत्रणा तयार करा :सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सोशल मीडिया चा गैरवापर रोखण्याकरिता तीन आठवड्यात यंत्रणा तयार करा :सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश

Share This
खबरकट्टा :


सर्वोच्च न्यायालयाने आज सोशल मीडियाच्या गैरवापरावर चिंता व्यक्त केली. देशात सोशल मीडियाचा दुरूपयोग होत असल्याचे  सर्वोच्च न्यायालयाने  म्हटले.हे थांबवण्यासाठी केंद्र सरकारने लवकरात लवकर नियम तयार करावेत असे आदेश दिले आहेत. यासाठी सरकारला तीन आठवड्याचा कालावधी देण्यात आला आहे.सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की, सध्या असा नियमांची गरज आहे ज्यामुळे ऑनलाइन फसवणूक आणि सोशल मीडियावर दिशाभूल करणारी माहिती पोस्ट करणाऱ्यांना ट्रॅक करता येईल. सोशल मीडियाचा गैरवापर कऱणाऱ्यांना रोखण्यासाठी आपल्याकडं तंत्रज्ञान नाही असं म्हणता येणार नाही. जर गुन्हेगारांकडे फसवणूक करण्यासाठी तंत्रज्ञान आहे तर ते रोखण्यासाठीही तंत्रज्ञान असेलच.

न्यायाधीश दीपक गुप्ता आणि न्यायाधीश अनिरुद्ध बोस यांच्या पीठाने सोशल मीडियाच्या गैरवापरावर चिंता व्यक्त केली. सोशल मीडियावर चुकीचे मेसेज पसरवणाऱ्यांची खरी ओळख होत नाही. सरकारला आता यावर उपाययोजना केल्या पाहिजेत असंही ते म्हणाले.

याआधीच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सोशल मीडियाबाबत लवकर पावले उचला असं सुनावलं होतं. जर तुम्ही काही करू शकत नसाल तर आम्हालाच काहीतरी करावं लागेल असं म्हटलं होतं.