"डीजे वाजविण्याची परवानगी" व्हायरल संदेश खोटा असून यंदा डीजे वाजविण्याची परवानगी कुणालाच नाही : आढळ्यास कारवाईस तैयार रहावे- डॉ. माहेश्वर रेड्डी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

"डीजे वाजविण्याची परवानगी" व्हायरल संदेश खोटा असून यंदा डीजे वाजविण्याची परवानगी कुणालाच नाही : आढळ्यास कारवाईस तैयार रहावे- डॉ. माहेश्वर रेड्डी

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : शहर प्रतिनिधि-

अनंत चतुर्दशी ला होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीत सोशल मीडियावर चंद्रपूर गणेश विसर्जनामध्ये डीजे ची परवानगी मिळाली असा संदेश व्हायरल होत आहे. 

हा संदेश चुकीचा असून जिल्ह्यात कुठेही डीजे वाजविण्याबद्दल परवानगी देण्यात आली नसून नागरिकांनी  अश्या अफवांवर विश्वास करू नये असे चंद्रपूर पोलिसांनी कळविले आहे.

हा व्हायरल संदेश खोटा असून यंदा डीजे वाजविण्याची परवानगी कुणालाच नाही.जे गणेश मंडळ किंवा व्यक्ती डीजे वाजविणार त्यांनी कारवाईला तैयार रहावे- डॉ. माहेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर 

असे सूचक वक्तव्य डॉ रेड्डी यांनी गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांना याद्वारे दिले आहे.मागिल वर्षी 2 बॉक्स ची परवानगी देण्यात आली होती परंतु यावर्षी असे काही नाही, डीजे यंदा वाजनारच नाही , गणेश मंडळांनी याची दक्षता घ्यावी जर आपण डीजे वाजविला तर तात्काळ कारवाई होणार.