हैद्राबाद मुक्ति संग्राम दिन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमीत्य "सेवा दिवस"चे आयोजन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

हैद्राबाद मुक्ति संग्राम दिन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमीत्य "सेवा दिवस"चे आयोजन

Share This
-विविध शाळेतील विद्यार्थीना मोफत नोटबुक व रुग्नाना फळ वाटप केले.

राजुरा 17 सप्टेंबर : 

हैद्राबाद मुक्ति संग्राम दिन  निमित्त व भारत देशाचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी  यांच्या  वाढदिवसानिमित्य राजुरा शहरात " सेवा दिवस " कार्यक्रम राबवीन्यात आला. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री,  हंसराज अहिर यांच्या मार्गदर्शनात व  राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार  ऍड.  संजय धोटे तसेच राजुरा विधानसभा क्षेत्र प्रमुख खुशाल बोंडे यांच्या नेत्रुत्वात  राजुरा शहरातील विविध विद्यालयांमध्ये मोफत नोटबुक व उपजिल्हा रुग्णालय येथे रूग्नाना फळ वाटप करण्यात आले.याप्रसंगी आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा आदिवासी सेवक ( म.रा.)वाघुजी गेडाम, संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष सतीश धोटे , भाजपा तालुका महामंत्री  ऍड. प्रशांत घरोटे, दिलीप वांढरे, भाजपा शहर अध्यक्ष ,बादल बेले, पंचायत समिती सदस्य नैना परचाके ,राजुरा नगर परिषदचे नगर सेवक राधेश्याम अडानिया ,प्रीति रेकलवार ,उज्वला जयपूरकर ,महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रेखा देशपांडे ,भाजपा नेते मिलिंद देशकर, भाजपा नेते सुरेश रागीट,मंगेश श्रीराम , गणेश रेकलवार , बंडु बोढे , संदीप गायकवाड , भाजयूमो  जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे, भाजयूमो विध्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहन कलेगुरवार, भाजयुमो विध्यार्थी आघाडीचे तालुका अध्यक्ष राहुल थोरात, भाजयुमो विध्यार्थी आघाडीचे शहर अध्यक्ष  सुधीर अरकिलवार, भाजयुमो विध्यार्थी आघाडीचे तालुका महामंत्री छबिलाल नाईक, युवा नेते कैलाश कार्लेकर ,आकाश गंधारे ,रत्नाकर पायपरे व समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. "सेवा दिवस " अंतर्गत मोफत नोटबुक वाटप करण्यात आले.यावेळी शिवाजी हायस्कूल येथे मुख्याध्यापक डांगे, पर्यवेक्षक पोटे, आदर्श मराठी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलीनी पिंगे , आदर्श हायस्कूल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर , महात्मा ज्योतिबा विद्यालय चे मुख्याध्यापक पंदिलवार ,पर्यवेक्षक ऊइके ,आशादेवि मराठी प्राथमिक चे मुख्याध्यापक दीपक सातपूते आदिंचि प्रामुख्याने उपस्थिति होती.या सर्वांनी माजी केंद्रीय ग्रूह राज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार ,अँड. संजय धोटे, राजुरा विधानसभाक्षेत्र प्रमूख खुशाल बोन्डे यांचे आभार व्यक्त करीत विध्यार्थीना सेवा दिवसाचे महत्व पटउन दिले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन भाजपा शहर अध्यक्ष बादल बेले यानी केले. तर आभार विध्यार्थी आघाडी जील्हाध्यक्ष मोहन कलेगूरवार यांनी केले.