ब्रेकिंग न्यूज : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांनी केला शिवसेनेत प्रवेश : चंद्रपूर जिल्ह्यातील आणखी हेवी वेट प्रवेश लवकरच - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग न्यूज : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांनी केला शिवसेनेत प्रवेश : चंद्रपूर जिल्ह्यातील आणखी हेवी वेट प्रवेश लवकरच

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : 

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांनी बुधवारी (ता. 4) मुंबई येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री येथे शिवसेनेत प्रवेश घेतला. पाऊणकर हे भद्रावती विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र, अचानक त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 
लोकसभेसाठीही त्यांनी कॉंग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने त्यांनी मतदारसंघात संपर्कही वाढविला होता. मात्र भद्रावती मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली. त्यात ते विजयी झाले. धानोरकर आता आपल्या पत्नीला रिंगणात उतरविण्याच्या तयारीत आहेत. 

त्यामुळे पाऊणकर यांनी पक्षबदल करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळे येथील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. येत्या निवडणुकीत ते शिवसेनेकडून मैदानात राहू शकतात.


राज्यात सर्वत्र पक्षप्रवेशाचे पीक उगवले असताना आता चंद्रपुरातील पाऊणकर या ज्येष्ठ कॉंग्रेसी नेत्याने शिवसेनेचे शिवबंधन मुंबई येथे पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या हस्ते शिवसेनेचे सचिव  श्री मिलिंद नार्वेकर,शिवसेना नेते श्री दिवाकर रावते, श्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती नीलिमाताई गोऱ्हे, खासदार भावनाताई गवळी  व चंद्रपूर जिल्ह्याचे माजी संपर्क प्रमुख श्री अजय स्वामी, श्री दत्ता बोरीकर, भद्रावती तालुका प्रमुख श्री भास्कर ताजने पाटील, श्री  वसंत मानकर  यांच्या उपस्थितीत  बांधले आहे.लवकरच काही अराजकीय हेवी वेट प्रवेश होन्याची शक्यता आहे.