गोंडवाना गणतंत्र पार्टीचा मंत्र्यांच्या आयोजित कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भर पावसात शेकडो कार्यकर्त्यांसहित ठिय्या : प्रशासनाची उडाली धांदल - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गोंडवाना गणतंत्र पार्टीचा मंत्र्यांच्या आयोजित कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भर पावसात शेकडो कार्यकर्त्यांसहित ठिय्या : प्रशासनाची उडाली धांदल

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : पोंभुर्णा -

आदिवासी समाजाच्या विविध २४ प्रकारच्या मागण्या घेऊन गोंडवाना गणतंत्र पार्टी ने शेकडो कार्यकर्त्याना सोबत घेऊन बस स्थानक चौकात ठाण मांडली.

मनोज आत्राम,जगन येलके, श्रीहरी सिडामच्या नेतृत्वाततब्बल आठ तासापासून हजारोंच्या संख्येने महिला युवक युवती  निघालेल्या समवेत मुसळधार पावसाचा मारा खात मागण्या मान्य होईपर्यंत हटायचे नाही हा निर्धार करुन रस्त्यावर ठिय्या दिला.


 • 50%आदिवासी बहुल गावांना 5 वी व 6 वी अनुसूचि अंतर्गत पेसा लागू करण्यात यावा. 
 • ईको पार्क ला विर बाबुराव शेडमाके नाव देण्यात यावे . 
 • प्रत्येक गावात गोटुल देण्यात यावे. 
 • विदर्भ राज्य वेगळे करुन त्याला गोंडवाना विदर्भ राज्य नाव देण्यात यावे. 


यासह पूर्ण 24 मागण्या घेऊन तहसील कार्यालयावर निघालेल्या या जनआक्रोश मोर्चाने बसस्थानक चौकात ठाण मांडल्याने हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधवानी संपूर्ण वाहतुक रोखून धरताच स्थानिक प्रशासनाची धांदल उडाली.

 दरम्यान तहसीलदार बिराजदार यांनी मोर्चेकरांची भेट घेतली परंतु त्यांच्या लेखी आश्वासन शिवाय तडजोड नाही अशी भुमिका घेतल्याने उपविभागीय अधिकारी खेडेकर यांनी मोर्चेकरांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला त्यांना सोमवारपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचवण्यात येईल असे आश्वासन दिले.

परंतु त्यानंतर सुद्धा मोर्चेकरांनी लेखी आश्वासन ला पाठ फिरवत आमच्या मागण्या आताच मान्य झाल्या पाहीजे त्याशिवाय हटनार नाही यामुळे तनावपूर्ण परीस्थिती निर्माण झाली असुन  सायंकाळी 8 वाजेपर्यंत मोर्चेकरी ठाण मांडुन बसले होते.

नवीन नगरपंचायत पोंभुर्णा च्या ईमारती च्या लोकार्पण सोहळा ला मंत्री येणार असल्याने प्रशासन याकडे कोनती भुमिका घेते व काय तोडगा निघतो हे महत्त्वाचे आहे.