कोरपना तालुक्यात नक्षलग्रस्त निधी अंतर्गत ७० लक्ष निधी मंजूर : भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्या प्रयत्नांना यश - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कोरपना तालुक्यात नक्षलग्रस्त निधी अंतर्गत ७० लक्ष निधी मंजूर : भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्या प्रयत्नांना यश

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना प्रतिनिधी :

कोरपना तालुक्यातील अनेक गावांमध्ये नक्षलग्रस्त भागाचा जलद गतीने विकास करणे या अंतर्गत ७० लक्ष निधीची पायाभूत सुविधांची विकासकामे आराखड्यात मंजूर करण्यात आली असून याकरिता भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार अँड.संजय धोटे,जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे,जिल्हाधिकारी,जिल्हा नियोजन अधिकारी,जिल्हा पोलिस अधीक्षक यांचेकडे सतत पत्रव्यवहार व पाठपुरावा केला होता त्यांनुषंगाने सदर कामे हि आराखड्यात मंजूर करण्यात आली.

       
कोरपना तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्मशानभूमी शेड,स्मशानभूमी शेडकडे जाणारे रस्ते,वाचनालय, इत्यादी कामे नव्हती,त्यामुळे अनेक गावातील नागरिकांना यासर्व बाबींचा नाहक त्रास सहन करावा लागत होता,स्वातंत्र्यानंतरही अनेक गावांमध्ये अंत्यविधी करण्यासाठी अनेक गावांमध्ये अंत्यविधीसाठी स्मशानभूमी शेड उपलब्ध नव्हते व काही गावांमध्ये स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते नव्हते  हि अत्यंत शोकांतीकेची बाब होती,त्यामुळे सदर बाबीची दखल घेत भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी नक्षलग्रस्त भागाचा जलद विकास करणे या अंतर्गत सदर कामे मंजुरी करीता विविध लोकप्रतीनिधी मार्फत प्रस्तावित केली,सदर प्रस्तावित  कामांना आराखड्यात मंजुरी प्राप्त झाली आहे,
           
कोरपना तालुक्यातील जेवरा,हेटी, शेरज खुर्द,शेरज बु,लोणी,भोयगाव या गावांमध्ये स्मशानभूमी शेड बांधकाम करणे,तसेच गांधीनगर,कोडशी खुर्द,बोरी नवेगाव,हिरापूर,या गावांमध्ये स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे बांधकाम करणे,नारंडा येथे स्मशानभूमी शेडला संरक्षण भिंत व वाचनालय इमारतीचे बांधकाम करणे, तसेच वनोजा येथे वाचनालय इमारत व अंगणवाडीला शौचालयाचे बांधकाम करणे प्रत्येकी ५ लक्ष रुपये निधी आराखड्यात मंजूर करण्यात आला आहे.
       
सदर कामे मंजूर झाल्यामुळे ग्रामीण भागातील अनेक गावातील स्मशानभूमी शेड व स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यांची समस्या मार्गी लागणार आहे,व तसेच इतर पायाभूत सुविधा मंजूर होणार त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.