वाचा कुणाच्या खांदयावर कुणाचे ओझे : गणेश विसर्जन डीजे आणि जोरगेवारांचा नेमका संबंध तरी काय.....??? - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वाचा कुणाच्या खांदयावर कुणाचे ओझे : गणेश विसर्जन डीजे आणि जोरगेवारांचा नेमका संबंध तरी काय.....???

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : खमंग चर्चा विश्लेषण -
एरव्ही राजकीय पालटावर कोन कधी कोनाला कुठे कसे गोवून, बिनाधार चर्चा घडवून आणेल याचा नेम नाही.अश्याच एका  ताज्या उदाहरणावर चंद्रपूर शहरात सध्या खमंग चर्चा सुरु आहे.तर मुद्दा आहे गणेश विसर्जन मिरवणुकीतील नियमबाह्य आवाज करणाऱ्या डीजे जप्तीचा व या डीजे परवानगी संबंधात काडीमात्र संबंध नसणाऱ्या अनेक पुढाऱ्यांचा.
विसर्जनाच्या पूर्वसंध्येलाच जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते की माझ्याकडे या वर्षी कोनाचाही  विसर्जन मिरवणुकीत डीजे वावराबाबत परवानगी मागण्यांबाबत फोन कॉल, किंवा निवेदन आले नसून तसेंही या वर्षी कोणत्याही मिरवणुकीत डीजे वाजविण्याबाबत संपूर्ण जिल्हाभरात परवानगी नाही. कोणतेही गणेश मंडळ नियम मोडताना आढळ्यास तात्काळ रीतसर कारवाही करण्यात येईल - विषय संदर्भात विडिओ सुद्धा जारी करण्यात आला होता.

हा स्पष्ट संदेश असूनसुद्धा शहरात झालेल्या मिरवणुकीत तब्बल 100च्या वर डीजे कर्कश आवाजात ध्वनी प्रदूषणाच्या नियमांची सर्रास पायमल्ली करत जिल्हा पोलीस अधीक्षकांचा संदेश पायदळी तुडवत नाचत होते.

सुरुवातीला काहींश्या प्रमाणात संभ्रमात असलेले अनेक डीजे मालक व गणेश मंडळ अहिर पुत्रानी नियम मोडत पुढाकार घेतल्याने पुढे धजावत जोरजोरात डीजे वाजवू लागले. परंतु मिरवणूक शहर पोलीस ठाणे समोर पोहोचताच धाबा धरून बसलेल्या पोलीस पथकानीं डीजे मालकांना धारिस् धरत जप्तीचा तडाखा लावून दिवसभरात तब्बल 129 डीजे संचांचे साहित्य जप्त केले.हे सर्व कायदेशीर सुरु असताना प्रत्येक गोष्टीतुन प्रसिद्धी-कुप्रसिद्धी करु पाहणारे पुढारी चूप बसणार ते कसे?

या नियमशीर पोलीस कारवाहीत कोणताही पुढारी किंवा नेता हस्तक्षेप करणे किंवा ती सुरुवातीलाच डीजे बाबत कणखर भूमिका घेतलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हस्तक्षेप करु देणे शक्य नव्हते. अश्या परिस्थिती कोणताही नेता जिथे सरळ कायदेशीर नियमाची पयमल्ली होत असताना नियम मोडणार्यांना डोक्यावर घेऊन स्वतः तोंडघशी नक्कीच पडणार नव्हताच.

परंतु कधी कधी आपल्याला समोरून कुणी येऊन धडकल्यानेच अपघात होईल असेच नाही.विनाकारण मागून येऊन धडक देऊनही अजाणतेपणे आपल्याला अनेक वेळा अपघातांचा सामना करावा लागतोच, आणि सध्या याचा चांगलाच प्रत्यय येतोय यंग चांदा ब्रिगेड चे अध्यक्ष किशोर जोरगेवार यांना.

विधानसभा निवणूक प्रचारात शहरात अत्यंत प्रभावीपणे आघाडीवर, जिल्ह्यातील ज्वलंत समस्यांवर यशस्वी उठाव व सामान्य जणतेच्या मुखमुखात असलेले हे नाव अनेकांना सलत असणार यात वाद नाहीच. अश्याच वृत्तीच्या काही विरोधकांनी मुद्दाम जोरगेवारांचे नाव यात गोवून स्वतःची प्रसिद्धी करून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. 

परंतु हे करीत असताना गणेश स्थापना ते विसर्जन या संपूर्ण उत्सव प्रसंगात शहातील सर्वच सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन शुभेच्छांची देवाण-घेवाण करताना कुठेही तुम्ही नियमाची पायमल्ली करा असे बोलताना कोणत्याही मीडिया सोसिअल मीडिया वर आढळले नाही किंवा कोणताही डीजे चालक संघ किंवा मालकानीं त्यांना भेटून आम्हाला परवानगी पाहिजे तर तुम्ही मिळवून द्या अशी मागणी करताना दिसला नाही. 

कारण त्यांना माहित होते की जोरगेवार जरी सर्वसामान्यांच्या प्रश्न, समस्यांची जान असलेले  नेते असले तरी कोणताही नियम-कायदा मोडण्याचा सल्ला ते देणार नाहीत किंवा समर्थनही करणार नाहीत. अनेक डीजे मालकांनी निवडणूक तोंडावर असताना जोरगेवारांच्या  संपर्कात आल्यास आपले गणित जमू शकते अशी अपेक्षा ठेऊन प्रत्यनही केला परंतू नियमबाह्य या शब्दावर जोरगेवारांकडून त्यांच्या पदरी निराशाच पडली असे एका मालकाने टीम सोबत बोलताना सांगितले.
यातच डीजे संच व ट्रॅक्टर जप्ती झाल्यानंतर  अनेक गणेश भक्तांना निराश होताना बघून जोरगेवार यांनीच मध्यस्ती करीत सोडायला लावले असे चित्र सोसिअल मीडिया वर बघावयास मिळाले.

तरीही एखाद्याची  गाडी व्यवस्थित चालत असताना मध्ये रोडा कसा टाकायचा हे माहित असणाऱ्या काही विरोधकांनी जोरगेवारांनीच परवानगी मागितली व जप्ती झाल्यावर तोंडघशी पडले अशी बिनाधाराची व कोणतीही वस्तुस्थिती जाणून न घेता व जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या परवानगी मागायला कोणीही आलेच नाही  संदेशाचा संदर्भ लपऊन जाणूनबुजून बातमी वायरल करून अर्थहीन चर्चेला तुल देण्याचा हा  प्रयत्न हास्यास्पद वाटतो.

(सूचना : वरील खमंग चर्चा विश्लेषण हे शहरात सुरु असलेल्या ताज्या चर्चांवर आधारीत असून याची टिप्पणे अनेक लोकांची आमच्या टीम सोबत झालेल्या व्यक्तिगत चर्चेवर व शहरातील नागरिकांच्या विविध मतांवर आधारित असून कोणतीही बाजू न घेता नागरिकांचे स्पष्ट मत मांडण्याचा आमचा माणस आहे.)