वडेट्टीवार, वारजूरकर, प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी घोषित : काँग्रेस च्या पहिल्या अधिकृत यादीत नाव :पहा अधिकृत यादी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वडेट्टीवार, वारजूरकर, प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी घोषित : काँग्रेस च्या पहिल्या अधिकृत यादीत नाव :पहा अधिकृत यादी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

विधानसभा 2019 निवडणुकीसाठी अखेर घटस्थापनेच्या मुहूर्तावर कॉंग्रेस पक्षाने आपली पहिली यादी जाहिर केली असुन चंद्रपूर जिल्ह्यातील तिन विधानसभा क्षेत्रांचा ह्या यादीत समावेश आहे.
आज जाहिर झालेल्या यादीनुसार ब्रह्मपुरी येथुन विद्यमान आमदार तथा विधानसभेतील गटनेते विजय वडेट्टीवार ह्यांना, चिमुर येथुन सतिश वारजुरकर तर वरोरा येथुन पक्षाचे राज्यातील एकमेव खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर ह्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर ह्यांना पाहिल्या यादीत स्थान मिळाले आहे.
राजुरा क्षेत्रातील उमेदवाराच्या नावाची घोषणा पाहिल्या यादीत झाली नसल्याने पक्षाच्या नेत्यांच्या मानत चलबिचल सुरु झाल्याचे चित्र दिसुन येत असुन ही जागा आघाडीतील राष्ट्रवादी पक्षाला मिळते की काय अशी शक्यताही नाकारता येत नाही.