राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुदर्शन निमकराना आघाडीतर्फे राजुरा विधानसभेची उमेदवारी जाहीर : खुद्द पवारांनी दिली माहिती - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुदर्शन निमकराना आघाडीतर्फे राजुरा विधानसभेची उमेदवारी जाहीर : खुद्द पवारांनी दिली माहिती

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा 
                    

थोडक्यात -
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या आदला बदलीच्या 7 सीटच्या निर्णयावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब आणि काँग्रेस चे नेते  राहुल गांधी यांच्यात झालेल्या चर्चा निर्णयांती  राजुरा विधानसभा क्षेत्रात काँग्रेस ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस ची उमेदवारी  सुदर्शन निमकर यांना निश्चित झाल्याची बारामती येथील आमच्या विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे.

वृत्त संबंधात निमकर यांचेशी दूरध्वनी संपर्क साधला असता,वृत्तास त्यांनी दुजोरा दिला असून,  निवडणुक कार्यक्रम जाहीर होतपर्यंत उमेदवारी जाहीर नं करण्याचा  सावध पवित्रा त्यांनी घेतला असल्याचे त्यांचेशी झालेल्या चर्चेतून कळते. 
कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेसच्या जागावाटपाच अंतिम सूत्र ठरलं असून आगामी विधानसभा निवडणुकीत कांग्रेस व राष्ट्रवादी प्रत्येकी 125 जागा लढवनार आहेत तर मित्र पक्षांना 38 जागा सोडण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या कांग्रेस राष्ट्रवादी ला पक्षांतराचा मोठा फटका बसला आहेया सर्व घडामोडीतुन सावरत दोन्ही पक्षानी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.दोन्ही पक्षानी समांतर अर्ध्या जागा लढविण्याबाबत एकमताने निर्णय घेतला असे काँग्रेस चे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांना सांगितले.

सुदर्शन निमकरांच्या उमेदवारीकडे राजुरा विधानसभा राजकीय वर्तुळात निर्णायक भूमिकेने पाहत असून सत्ताधारी व संघटनेच्या प्रतिस्पर्ध्यांवर याचा निश्चित परिणाम होईल व स्थानिक काँग्रेस नेमकी काय भूमिका घेईल यावर सर्वांचे लक्ष वेधले आहे.