घरांच्या पट्ट्यासाठी श्रमिक एल्गार आक्रमक : सिंदेवाही तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

घरांच्या पट्ट्यासाठी श्रमिक एल्गार आक्रमक : सिंदेवाही तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :सिंदेवाही -

सिंदेवाही तालुक्यातील लोनवाही सिंदेवाही शहर, जाटलापूर तुकूम येथील अनेक नागरिकांना घराचे पट्टे नसल्यामुळे त्यांना घरापासून घरकुला पासून वंचित राहावे लागत आहे. अशा गरजू कुटुंबीयांना तातडीने घराचे पट्टे आणि घरकुल मंजूर यावी अशी मागणी श्रमिक एल्गार च्या अध्यक्ष अॅड.पारोमिता गोस्वामी यांनी तहसीलदारांकडे केली.


श्रमिक एल्गारच्या वतीने सिंदेवाही येथील जुना बस स्थानक ते तहसील कार्यालयापर्यंत महिलांचा मोर्चा काढण्यात आला यावेळी सिंदेवाही शहर, लोनवाही, जाटलापुर तुकूम येथील महिला पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या तिन्ही गावातील नागरिकांना घराचे पट्टे नसल्याने घरकुला पासून वंचित राहावे लागत आहे त्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते त्याचे घर नसल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे पावसाचे दिवस सुरू असल्याने गैरसोय होऊ शकते. यासंदर्भात तहसील आपल्याकडे अनेकदा निवेदने देऊन मागणी रेटून धरण्यात आले होते मात्र अद्यापही त्यावर कारवाई करण्यात आली नाही.

त्यामुळे मोर्चा काढून याकडे शासनाचे लक्ष वेधले जाटलापुर येथील शेकडो नागरिक मागील तीस चाळीस वर्षांपासून वास्तव्यास आहेत सदर अतिक्रमण जागेचा शासनाकडे नियमाप्रमाणे दंड भरीत आहेत मात्र घराचे पट्टे नसल्याने तसेच त्यांचा सिटीसर्वे न झाल्याने विकास आराखडा रखडलेला आहे ही बाब यावेळी एडवोकेट पारोमिता गोस्वामी यांनी तहसीलदारांचे निदर्शनास आनुन दिले. अॅड.गोस्वामी यांनी मोर्चेकरुना मार्गदर्शन करतेवेळी आजी माजी आमदारावर नाराजी व्यक्त करीत निधी खेचुन आननारे आमदार घरकुलाचा पन नीधी खेचुन आनावा मात्र आसे न करता केवळ सिंदेवाही तहसिल गळते म्हणुन तहसिलकार्यालयाच्या बांधकामासाठी चौदा कोटी मंजुर केले यामुळे सामान्य जनतेला काय फायदा असा प्रश्नही उपस्थित केला. महीलांचा स्वाभिमान व त्यांची सुरक्षा केवळ पक्का घर असुन शासन आणि नेते मात्र उदासिन आहेत याकडेही लक्ष वेधले.

या मार्चात श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष विजय सिद्धावार,महासचिव घनशाम मेश्राम, आमआदमी पार्टिचे मनोहर पवार, भिवराज सोनी बबन क्रिष्ण पल्लीवार, संदिप पिंपळकर, विनायक गजभीये, सामाजिक युवा ब्रिगेडचे अमोल निनावे, सिंदेवाही तालुका अध्यक्ष शशिकांत बतकमवार, संगिता गेडाम, शांताराम आदे, देवनाथ गंडाटे, शहनाज बेग, कुंदा गेडाम, शितल वाडगुरे, शारदा खोब्रागडे, शुभम येरमे, ओमकार कोवे, अजय गेडाम, विलास नाने, प्रमोद गावडे, खुशाल कन्नाके, खूशाल कन्नाके, पुरुष्षोत्तम सिडाम यासह शेकडो नागरीक मोर्चात सहभागी होते.