बनावट आदिवासी जातप्रमाणपत्राच्या आधारे भूषविले सरपंच पद : जिवती पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बनावट आदिवासी जातप्रमाणपत्राच्या आधारे भूषविले सरपंच पद : जिवती पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Share This
जिवती : जिवती तालुक्यातील खडकी हिरापुर ग्राम पंचातीची निवडणूक सन २०१६ मध्ये पार पडली. यात अमृतवर्षा बालाजी पिलेवाड ह्या प्रभाग क्र. ३ मधुन अनुसुचित जमातीकरिता राखिव असलेल्या जागेवरून त्या निवडणूक जिंकल्या बनावट दस्तऐवज सादर करित जातिचे प्रमाणपञ काढुन सरपंच पदावर विराजमान झाल्या.

याबाबत आरिफ शेख यांनी माहिती अधिकारखाली माहिती घेत सरपंचावर न्यायालयात खटला चालविला होता. त्यानुसार तपासणी करून सदर महिला सरपंचावर पाटण पोलिस स्टेशन ला दि. २८ ऑगस्ट रोजी भा. द. वी. कलम ४२०, ४६८, ४७१, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर शाळा सोडलेले प्रमाणपञ जि. प. उच्च प्रा. शाळा चंदनवाही यांनी दिले असून दाखल खारिज क्र. २७१ असा नमुद करण्यात आला आहे. याचे खरे नाव हरिचंद्र उध्दव राठोड असून त्याची जात बंजारा आहे. हरिचंद्र यांच्या मुळषाटिसीच्या झेरॉक्स प्रतिमध्ये खाडाखोड करून त्यामध्ये आडनाव पिल्लेवाड नमुद करून जात कोळी महादेव करून जातिचे प्रमाणपञ मिळविण्यासाठी मा. उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्याकडे अर्ज करून जात प्रमाणपत्र मिळविले असून खोटे दस्तऐवज सादर करून शासनाची दिशाभुल करित आदिवासी बांधवांचा लाभ घेत आहे.

खडकी हिरापुरच्या सरपंच अमृतवर्षा यांचे वडील बालाजी असून बालाजीचे वडील सुरोजी आहे. असे ग्रामपंचायत दस्तऐवजावरून दिसून येत परंतु गैरअर्जदारांनी जातीचे प्रमाणपञ काढताना वंशावळमध्ये तिचे आजोबा उध्दव आणि पंजोबा हरिचंद्र पिल्लेवाड आसा उल्लेख केलेला आहे. वास्तविक उध्दव आणी हरिचंद्र हे दोन्ही व्यक्ती आजोबा व पंजोबा नसतानाही अमृतवर्षा यांने जात प्रमाणपञ मिळविताना केलेल्या अर्जामध्ये वशांवाळमध्ये दर्शविल्याप्रमाणे पंजोबा हरिचंद्र पिल्लेवाड यांचे खोटे शाळा सोडल्याचे प्रमाणणपञ जोडलेले आहे. 

याबाबत सामाजिक कार्यकर्ता आरिफ शेख यांनी पोलिसात तक्रार दिली माञ पोलिसांकडुन वारंवार दुर्लक्ष केले जात असल्याने जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे धाव घेतली परंतु तिथेही न्याय मिळाले नाही शेवटी न्यायालयाने अर्जदारांने दाखल केलेल्या दस्तऐवजावरून संभ्रम निर्माण होत असल्याने अर्जदारांने गैरअर्जदारावर लावलेले आरोप प्राथमिक दृष्या सकृत दर्शनी दिसून येते सदर दस्तऐवजामध्ये केलेले फेरबदल व त्यामागचे सत्य उलघडण्याकरिता त्याचा सखोल तपास करण्यासाठी न्यायालयाने पाटण पोलिसांना आदेश दिले असून त्यानुसार चौकशी करून गैरअर्जदाराविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.