बदलते समीकरण : ब्रम्हपुरी शिवसेनेच्या कोट्यात : संदीप गड्डमवार सुद्धा शिवबंधनात ! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बदलते समीकरण : ब्रम्हपुरी शिवसेनेच्या कोट्यात : संदीप गड्डमवार सुद्धा शिवबंधनात !

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :


ब्रम्हपुरीत काँग्रेसची उमेदवारी विजय वडेट्टीवार यांना घोषित झाल्यामुळे राष्ट्रवादीचा विषयच संपला होता. ब्रम्हपुरीत भाजपचे अतुल देशकरांनी दावा केला होता परंतु युतीमध्ये ही जागा शिवसेनेने गेली. आता सेनेकडेही उमेदवार नाही. आणि वडेट्टीवार हे पुर्वाश्रमीचे शिवसेनेचे असल्यामुळे पूर्वीचे शिवसैनिक आजही आहेत. अशातच भाजपने ब्रम्हपुरीची जागा सेनेला सोडल्यामुळे संदीप गड्डमवार यांनी सेनेत जाण्याचा निर्णय घेतला.

कट्टर काँग्रेसवासी दिवंगत वामनराव गड्डमवार यांचे सुपुत्र संदीप गड्डमवार हे मंगळवारला सकाळी शिवबंधन बांधणार आहेत. त्यामुळे ब्रम्हपुरीत वडेट्टीवार विरूद्ध गड्डमवार असा ‘वारां’मध्ये सामना रंगणार आहे.

महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांचे सावली स्वागत केल्यानंतर ते भाजपात जाण्याची चिन्हे होती. परंतु आमचं ठरलयं एवढेच गड्डमवार सांगत होते. परंतु ही जागा भाजपला गेली तर आधीच दावेदार असल्यामुळे त्यांच्यासमोर अडचणी होत्या. आता ही जागा सेनेला जाणार असल्यामुळे गड्डमवारांनी सेनेत जाण्याचा निर्णय घेतला. आता ब्रम्हपुरीत ‘वारां’मध्ये लढत रंगणार असून कोण कुणावर भारी पडतो, हे येत्या काही दिवसात दिसेलच.