जिवती येथे श्रावण सोहळा संपन्न : लोकमत सखी मंच जिवती चा उपक्रम : विविध स्पर्धाचे आयोजन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिवती येथे श्रावण सोहळा संपन्न : लोकमत सखी मंच जिवती चा उपक्रम : विविध स्पर्धाचे आयोजन

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : संतोष इंद्राळे जिवती: 

श्रावण महिन्यात हिरव्याकंच निसर्गात समरस होण्यास सखीना प्रोत्साहन मिळावे म्हणून लोकमत सखी मंच जिवती च्या वतीने दि.01 सप्टेंबर 2019 रोज रविवार ला जिवती नगर पंचायत च्या सभागृहात दुपारी 12 वाजता श्रावण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानी जिवती नगर पंचायतच्या नगराध्यक्ष पुष्पा नैताम-सोयाम  होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून अंगणवाडी पर्यवेक्षिका माया नामवाड ताई,सौ.रंजना अशोक जाधव नगरसेविका,अश्विनी वाकडे अधीक्षिका होत्या. सोहळ्यात सर्व सखींनी भरभरून सहभाग घेऊन स्पर्धेचा मनमुराद आनंद घेतला.


सोहळ्यात आयोजित फॅशन शो स्पर्धेत उज्वला देवाले यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर सौ सुधा कनाके आणि माया वाकडे या अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय आल्या.

उखाणे स्पर्धेत लता गायकवाड, मनीषा राठोड, पुष्पा सोयाम यांनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटीकाविला.


दोरी वरील उड्यात मनीषा राठोड,सुलोचना चव्हाण,सोनू पवार यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविला.एक मिनिट गेम शो,रस्सी खेच,फुगडी इत्यादी मनोरंजक खेळ घेण्यात आले.

सोहळ्यासाठी अगदी वेळेवर सभागृह उपलब्ध करून दिल्या बद्दल मुख्याधिकारी विशाखा शेरकी मॅडम यांचे आयोजकांनी विशेष आभार मानले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिवती संयोजिका  सौ.वर्षा कमलाकर गुरमे  तसेच  सुनीता नामवाड, सुधा कन्नाके,सुनीता वाघमारे ताई  जिवती सखी मंचाच्या सदस्य सखींनी आणि जिवती शहर प्रतिनिधी संघरक्षित तावाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.